आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकी चित्त्यांचे स्वागत:कुनो पालपूर अभयारण्यात आफ्रिकी चित्त्यांच्या स्वागतासाठी माेदी जाणार

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जन्मदिनी १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशच्या कुनो पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात येणाऱ्या ८ आफ्रिकी चित्त्यांचे स्वागत करतील. हे चित्ते दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणले आहेत. चित्त्यांसाठी कुनोमध्ये अधिवास तयार झाला आहे. पाच हेलिपॅड केले जात आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, या भेटीची प्रतीक्षा होती.

श्योपूर जिल्ह्यातील कुनो अभयारण्यात चित्त्याच्या अधिवासासाठी सरकारी प्रकल्पावर वर्षभरापासून काम सुरू आहे. दक्षिण आफ्रिकी तज्ज्ञांच्या पथकानेही कुनोचा दौरा केला आहे. कुनो अभयारण्य चित्त्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने तयार केले जात आहे. चित्ते या ठिकाणी राहिल्यानंतर मध्य प्रदेशमधील वन्यजीव पर्यटनास आणखी चालना मिळेल, अशी आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...