आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात वैयक्तिक आरोग्य विम्याचे क्लेम केवळ एका वर्षात ६०% वाढले आहेत. सर्वाधिक वाढ बिहार व यूपीमध्ये झाली. विमा नियामक इर्डानुसार, २०२१ मध्ये एकूण ९५.३३ लाख लोकांना आजाराचे विमा कवच मिळाले होते. २०२२ मध्ये ही संख्या १.४८ कोटी झाली. तज्ज्ञांनुसार, याचे एक कारण पोस्ट कोविड आजार असू शकते. देशात २०१५ मध्ये १.०८ कोटी हेल्थ पॉलिसीच्या माध्यमातून २८.५५ कोटी लोकांचा विमा झाला होता. कंपन्यांना १९,८७३ कोटींचे प्रीमियम मिळाले होते. १८,२२२ कोटींचे क्लेम देण्यात आले. १,६५१ कोटी रुपयांचा नफा कंपन्यांनी कमावला. तथापि, २०२१-२२ मध्ये ५२ कोटी लोकांनी विमा घेतला. म्हणजे विमाधारक दुप्पट झाले.
विमा क्लेमचे सर्वाधिक ७५% निर्णय हैदराबादेत
ग्राहकांच्या बाजूने लागले, दिल्लीत सर्वात कमी ३%
केंद्र ग्राहकाच्या कंपनीच्या रिजेक्ट
बाजूने बाजूने दावे
हैदराबाद 75% 25% 1,088
जयपूर 72% 28% 235
लखनऊ 69% 31% 446
भोपाळ 55% 45% 569
पाटणा 52% 48% 403
चंदीगड 44% 56% 1,137
अहमदाबाद 43% 57% 1,251
दिल्ली 3% 97% 184
८७% प्रकरणांचा निपटारा १ महिन्यात
कालावधी २०२२ 2015
एक महिना 87.17% 81.74%
१ ते ३ महिने 10.52% 14.06%
३ ते ६ महिने 1.59% 3.33%
६ तेे १२ महिने 0.53% 0.73%
१ ते २ वर्षे 0.15% 0.11%
२+ वर्षे 0.04% 0.04%
(आकडे विमा लोकपालनुसार)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.