आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:वैद्यकीय शिक्षण, त्याचे नियमन हा व्यवसाय बनला आहे : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीट-एसएस परीक्षेच्या पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याने कोर्ट संतप्त

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-सुपर स्पेशालिटी (नीट-एसएस) २०२१ च्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कठोर टिप्पणी केली. या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. कोर्ट म्हणाले, ‘देशात वैद्यकीय शिक्षण व त्याचे नियमन हा व्यवसाय बनला आहे. रिकाम्या जागा भरण्यासाठी पॅटर्न बदलण्याची घाई करण्यात आल्याचे दिसते.’

न्या. डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोर्टाने विचारले की, “तुम्हाला इतकी घाई का आहे की पॅटर्न पुढील सत्रापासून लागू करता येणार नाही? नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये तुम्ही ऑगस्टमध्ये बदल करून टाकता.

विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली तर परीक्षा जानेवारीत ठरवून टाकली. आधी ६० टक्के प्रश्न सुपर स्पेशालिटी व ४० टक्के फीडर श्रेणीतून यायचे. आता तुम्ही १०० टक्के प्रश्न सामान्य वैद्यकीयच्या फीडर श्रेणीतून टाकले. ज्या डाॅक्टर्सनी जुन्या पॅटर्नने तयारी केली आहे त्यांच्यासाठी नवी तयारी कशी शक्य आहे?’ याप्रकरणी बुधवारीही सुनावणी होणार आहे.

अन्यथा आम्ही कठाेर निर्णय घेऊ : सुप्रीम कोर्टाचा इशारा
सुनावणीत कोर्ट म्हणाले, “सरकारी कॉलेजांत कधीही जागा रिक्त राहत नाहीत, त्या नेहमी खासगी काॅलेजांत असतात. हा सर्व उपद्व्याप खासगी कॉलेजांतील रिक्त जागा भरण्यासाठीच दिसतोय. हे देशाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आपत्तीपेक्षा कमी नाही. परीक्षा पॅटर्नमध्ये बदलांचा विचार पुढील वर्षापासून करावा. आम्ही तुम्हाला सुधारण्याची संधी देत आहोत. अन्यथा आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल.’

बातम्या आणखी आहेत...