आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Medical Staff Need One Lakh PPE Kit Every Day To Prevent Infection, We Are Making 12 Thousand

कोविड-19:मेडिकल स्टाफला संक्रमणापासून बचावासाठी रोज एक लाख पीपीई किटची गरज, आपण बनवतोय 12 हजार  

नवी दिल्ली / मुंबई 3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • देशात 50 डॉक्टर कोरोनाग्रस्त, सध्या पीपीई किटची स्थिती काय?

पवनकुमार /  विनोद यादव 
देशात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई)किट उपलब्ध नाहीत, अशा बातम्या येत आहेत. कोविड-१९ महामारीच्या प्रसारापूर्वी देशात पीपीईची वार्षिक मागणी ५० हजार होती. तज्ज्ञांच्या मते, आता रोज एक लाखापेक्षा जास्तची आवश्यकता आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव निहार रंजन दास सांगतात की, सध्या रोज १२ हजार पीपीई किट आणि १.२५ लाख एन-९५ मास्क तयार होत आहेत. २५ एप्रिलपर्यंत रोज ३० हजार पीपीई तयार होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, कोरोना पाय पसरत होता, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात पीपीईची कमतरता असल्याचा इशारा दिला होता. मात्र भारतात १९ मार्चला याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. देशात ३० जानेवारीला पहिला बाधित आढळल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पीपीईच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र ८ फेब्रुवारीला पुन्हा मास्क व ग्लोव्हजची निर्यात सुरू केली होती. 

Q&A तिकडे चीनमध्ये रोज बनताहेत १२ कोटी मास्क 

पीपीईचे संकट का आहे ?
 
असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्सचे (इंडिया)मुख्य सचिव डॉ. गिरधर ज्ञानी सांगतात की, डॉक्टरना एका दिवसात ३ वेळा पीपीई किट बदलावे लागते. फिक्कीच्या आरोग्य सेवा समितीचे सह-अध्यक्ष डॉ. एन. सुब्रमण्यम सांगतात की, पीपीईचा वापर फक्त एकदाच करता येतो. पीपीई किटमध्ये गाऊन, टोपी, शू-कव्हर, मास्क आणि ग्लोव्हज येतात. 

रोज किती किटची गरज आहे ? 

देशात रोज किमान एक लाख पीपीई किट लागतात असा अंदाज आहे. कारण डॉक्टरशिवाय आयसोलेशन वॉर्डातील कर्मचाऱ्यांनाही याची आवश्यकता असते.

देशात हे कोण तयार करते ? 

किट निर्मिती करणाऱ्या कंपन्या वाढताहेत. आता सुमारे ३९ कंपन्या आहेत. मागील आठवड्यात रोज १२ हजार पीपीई किटची आपली क्षमता होती. 

किटची किंमत काय असते ?
 
इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीनचे अध्यक्ष डॉ. ध्रुव चौधरी सांगतात की, पूर्वी चांगल्या दर्जाचे किट ७०० ते ९०० रुपयांना मिळायचे. आता रेट कॉन्ट्रॅक्टच्या हिशेबाने किट १२००-१३०० रुपयांना मिळते. 

चीनने हे संकट कसे सोडवले ?
 
जानेवारीत जेव्हा चीनमध्ये संसर्गाने थैमान घातले तेव्हा त्यांनी २ अब्ज मास्क आयात केले. तर ४० कोटी पीपीई किट आणि गॉगल्स आदी मागवले. 

इतर देशांत काय स्थिती आहे ?
 
ब्रिटनच्या डॉक्टर्स असोसिएशनने १९३ रुग्णांलयातील संशोधनानंतर सांगितले की, ७७% डॉक्टरांकडे अस्तर असलेले गाऊन नाहीत. अमेरिकेत पीपीईची कमतरता असल्याचे सांगणाऱ्या डॉक्टरला काढून टाकण्याची धमकी मिळाली. अमेरिकेला येत्या काही महिन्यांत ३.५ अब्ज मास्कची आवश्यकता आहे. 

बातम्या आणखी आहेत...