आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meenakshi Lekhi | Pegasus Phone Tapping Case; Amnesty International, BJP Leader Meenakshi Lekhi Fake Story Claim; News And Live Updates

पेगासस हेरगिरी प्रकरण:अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलने फेटाळला भाजपचा दावा, म्हणाले - आम्ही तपासाच्या बाजूने उभे आहोत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपासातील डेटाचा संबंध एनएसओशी आहे - अॅम्नेस्टी

देशात सध्या इस्त्रायली स्पायवेअर पेगाससवरुन प्रचंड गदारोळ सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे विरोधक याची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे, केंद्र सरकार हे लोकशाही विरोधातील षडयंत्र असल्याचे सांगत आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने भाजपचा दावा फेटाळून लावला आहे.

भाजपने अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या हवाल्याने भारतातील हेरगिरी प्रकरणाचा इस्त्राईल एनएसओशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. परंतु, हा दावा अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने फेटाळून लावला असून आम्ही तपासाच्या बाजूने असल्याचे सांगितले आहे.

तपासातील डेटाचा संबंध एनएसओशी आहे - अॅम्नेस्टी
अॅम्नेस्टीने एक निवेदन जारी करत म्हटले की, आम्ही तपासाच्या बाजूने असून अफवा आणि खोट्या बातम्यांना नाकरतो. या तपासातून जे काही सत्य समोर येईल आम्ही त्या तथ्यांसोबत उभे असल्याचे अॅम्नेस्टीने सांगितले. त्यासोबतच इस्त्राईली स्पायवेअर पेगासस प्रकरणातील डेटा एनएनओ ग्रुपशी संबंधित आहे. हा तपास थांबवण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जी यादी आली ती खरी नाही - भाजप प्रवक्ता
भाजप प्रवक्ता मीनाक्षी लेखी यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी अॅम्नेस्टी स्वत: याचा संबंध इस्त्राईली कंपनी एनएनओशी मानत नसल्याचा दावा केला होता. त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर जी यादी व्हायरल होत आहे. ती खरी नाही. हे भारताचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे लेखी म्हणाल्या होत्या.

अॅम्नेस्टीजवळ 50 हजार नंबरांची माहिती

  • पॅरिसमधील संस्था फॉरबिडन स्टोरीज आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल यांना 2016 मध्ये एनएसओकडून लक्ष्य केल्या जाणाऱ्या 50 हजार नंबरची यादी मिळाली होती. परंतु, ती कशी व का मिळाली? याबाबत संस्थानांनी अद्याप कोणतीच माहिती दिली नाहीये.
  • या संस्थांनी ही बातमी गार्डियन, वॉशिंग्टन पोस्टसह 17 वृत्तसंस्थांशी शेअर केली. त्यानंतर या माध्यम संस्थांमधील 80 पेक्षा जास्त पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांपासून या स्टोरीवर काम केले.
बातम्या आणखी आहेत...