आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:रुग्णालयाची ऑफर; 2500 रुपयांत मिळवा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट, एफआयआर दाखल

मेरठ10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयाच्या मालकाने फेटाळला आरोप, बदनामी करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल केल्याचा केला दावा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सुमारे 24 हजार रुग्ण वाढत आहेत. रशियाला मागे टाकत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा संक्रमित देश ठरला आहे. एकीकडे रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र झटत असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रुग्णालयाने धक्कादायक ऑफर सुरू केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.        व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रुग्णालयातील कर्मचारी 2500 रुपयांता कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल, असे सांगताना दिसत आहेत. एवढेच नाही तर हा रिपोर्ट 14 दिवसांसाठी ग्राह्य राहील आणि या रिपोर्टवर सरकारी रुग्णालयाचा शिक्काही देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासोबत रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या या खाजगी रुग्णालयातविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, कोणाला असे रिपोर्ट देण्यात आलेत का? याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणलाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान रुग्णालयाचे मालक शाह आलम यांनी आरोप फेटाळला असून आपली बदनामी करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल केल्याचा दावा केला आहे. मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. तसेच पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचाही आदेश दिला होता. राजकुमार सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने दिलेल्या निगेटिव्ह रिपोर्टदेखील आपल्याकडे असून त्यावर रुग्णालयाचा शिक्का आहे.

बातम्या आणखी आहेत...