आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाला ठोस संदेश देण्यासाठी शनिवारी जम्मूत गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या संमेलनात हे काँग्रेस नेते चक्क भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते. “गांधी-२३’ म्हणून शिक्का लागलेल्या या नेत्यांनी शांततेचा संदेश देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले असले तरी हा पक्षनेतृत्वाला एक इशाराच असल्याचे मानले जात आहे.
गांधी फाउंडेशन नामक संस्थेने या संमेलनाचे आयोजन केले आहे. या संस्थेचे प्रमुख गुलाम नबी आझाद आहेत. या संमेलनास आनंद शर्मा, कपिल सिब्बल, राज बब्बर, विवेक तनखा, भूपिंदरसिंह हुडा, मनीष तिवारी इत्यादी नेत्यांची उपस्थिती होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून खुले पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये आझाद, सिब्बल, शर्मा यांचा समावेश आहे. काँग्रेस म्हणते...
या नेत्यांनी पाच राज्यांत जायला हवे
देशात पाच राज्यांत निवडणूक होत आहे. अशा वेळी या नेत्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी त्या राज्यांत जायला हवे होते. पक्षालाही याचा अभिमान वाटला असता. - अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेस प्रवक्ते
चार महत्त्वाची वक्तव्ये...
गुलाम नबी आझाद : काँग्रेसमध्ये सर्वांचा सन्मान केला जातो. हीच आमची शक्ती आहे. ती शक्ती आणखी वाढवू.
आनंद शर्मा : आमच्यापैकी कुणीही पक्षात इथपर्यंत मधल्या मार्गाने आलेला नाही. समोरच्या दाराने आलेले आहेत.
कपिल सिब्बल : गुलाम नबी आझाद म्हणजे अनुभवी पायलट आहेत. त्यांच्या अनुभवाचा वापर पक्ष का करून घेत नाही?
राज बब्बर : लोक “जी-२३’ म्हणतात, (असंतुष्ट काँग्रेस नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव दिले होते.) मी “गांधी-२३’ म्हणेन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.