आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meeting Of Opposition Party Leaders At Congress President Kharge's Office Today, Meeting To Be Held At Kharge's Office In The Parliamentary Complex

काँग्रेसाध्यक्ष खरगेंच्या कार्यालयात आज विराेधी पक्ष नेत्यांची बैठक:खरगे यांच्या संसदीय संकुलातील कार्यालयामध्ये होणार बैठक

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दृष्टीने धोरण ठरवण्यासाठी साेमवार, १३ मार्च रोजी सकाळी विराेधी पक्षांची बैठक हाेणार आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदीय संकुलातील कार्यालयामध्ये ही बैठक सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

विराेधी नेते सकाळी भेटल्यानंतर काँग्रेस खासदारांचीही बैठक हाेणार आहे. त्यात पक्षाची संसदीय भूमिका ठरवण्यासाठी विचारविनिमय हाेऊ शकताे. त्यात सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी रणनीती ठरवली जाईल. अदानी समूह, चीनसाेबतचा सीमावाद, महागाई, बेराेजगारीच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला लक्ष्य केले जाऊ शकते. त्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हादेखील विराेधकांच्या अजेंड्यावरील विषय असेल. त्यातही राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व कुटुंबीयांवरील कारवाईवरून सरकारला घेरले जाईल. १ एप्रिलपर्यंत अधिवेशनाचा समाराेप हाेण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...