आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेघालयातील पूर्व शिलाँगच्या आमदार अँपरिन लिंगडोह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा दिला आहे याबाबतची माहिती त्यांनी स्वतः दिली. राजीनाम्याचा फोटो त्यांनी आज सकाळी ट्विटरवर शेअर केला.
अॅंपरिन लिंगडोह यांनी राजीनाम्यात लिहले की, मला पक्षाने खूप पाठिंबा दिला. याबद्दल मी कृतज्ञ आहे. परंतू, अलिकडच्या काळात पक्षातील घडामोडीमुळे मला खात्री पटली की, पक्षाने आपली दिशा चुकवली आहे. पक्ष आणि नेतृत्वाने याचा विचार करण्याची गरज आहे. आत्मपरिक्षणाची खरी आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
पुढील वर्षी निवडणुका, कॉंग्रेसला धक्का
मेघालयामध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. अॅपरिन लिंगडोह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आणखी एका आमदारासोबत आमदार लिंगडोह सत्ताधारी पक्ष एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी) मध्ये सामील होणार आहेत. मात्र, त्य एनपीपी या पक्षात सामील होणार की नाही, याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
काँग्रेस पक्षाने दिशा गमावली, नेतृत्वाने विचार करावा - अँप्रीन लिंगडोह
"माझ्या आयुष्यातील बहुतांश काळ मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कट्टर समर्थक म्हणून घालविला आहे. पक्षाने मला मंत्री म्हणून आणि माझ्या पूर्व शिलाँग मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मेघालयातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे, असे अॅंप्रीन लिंगडोह यांनी लिहले. यात त्यांनी शिलॉंग पूर्वचा देखील राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ट
पक्षाने माझी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्तीही केली असून, पक्षाने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मात्र, पक्षातील अलीकडच्या घडामोडींमुळे याची खात्री पटली आहे. मला वाटते की पक्षाने दिश गमावली आहे. पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने यावर चिंतन करण्याची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, अशा आत्मपरीक्षणाचे नेतृत्व करण्याचे प्रामाणिक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.
यासोबतच त्यांनी पत्रात म्हटले की, "काँग्रेस पक्षाचा मेघालयातील लोकांशी संपर्क तुटला आहे. त्यांच्या सेवेसाठी हे माझ्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे मला अत्यंत खेद वाटतो की, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा देत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.