आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meghalaya Govt BJP Minister Sanbor Shullai Asks People To Eat More Beef Than Chicken, Mutton And Fish; News And Live Updates

भाजप नेत्याचे मोठे विधान:मेघालयचे मंत्री शुलाई म्हणाले - लोकांनी चिकन-मटनपेक्षा जास्त गोमांस खावे, असे समजू नका की भाजप यावर कोणताही कायदा आणेल

शिलाँग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांमधील वाद पोलिसांच्या मदतीने सोडवावा

राज्यातील लोकांनी चिकन, मटन आणि माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्याचा सल्ला मेघालयातील भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सबनोर शुलाई यांनी दिला आहे. लोकांनी कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात गोमांस खावे. आपला देशात लोकशाही असल्याने प्रत्येकजण जे पाहिजे ते खाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले. ते आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप नेते सबनोर शुलाई यांना गेल्याच आठवड्यात राज्याच्या पशुसंर्वधन आणि पशुवैद्यकीय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात भाजप गोहत्या बंदी कायदा आणणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. विशेष म्हणजे शुलाई यांनी संबंधित विभागाची जबाबदारी स्वीकारताच हे मोठे विधान केले आहे.

राज्यांमधील वाद पोलिसांच्या मदतीने सोडवावा
मेघालय आणि आसाम दरम्यान गेल्या काही दिवसापासून सीमा विवाद सुरु आहे. राज्याच्या सीमेसाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी तेथील लोकांनी पोलिसांची मदत घ्यावी असे ते यावेळी म्हणाले. जर आसामच्या लोकांनी सीमेजवळ राहणाऱ्या आमच्या लोकांना त्रास दिला तर आम्ही त्यांच्याशी चहावर चर्चा करत राहणार नाही, तर उचित कारवाई केली जाईल असे शुलाई यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...