आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीदरम्यान अशा काही जागा आहेत. ज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. एकीकडे सर्वच पक्षांनी अनेक करोडपती उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. तर काहींची संपत्ती हजारोंपर्यंत मर्यादित आहे. तर तिन्ही राज्यांतील गरीब उमेदवारांबद्दल जाणून घेऊया.
त्रिपुरातील हे तीन गरीब उमेदवार आहेत
1. हिरमुनी देबबर्मा, अपक्ष: अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले हिरामुनी देबबरमा हे त्रिपुराचे सर्वात गरीब उमेदवार आहेत. देबबर्मा यांनी पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील मंडई बाजार (एसटी) सीटवरून नशीब आजमावले. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती केवळ 700 रुपये असल्याचे जाहीर केले आहे.
2. नागेंद्र चंद्र शील, अपक्ष: नागेंद्र चंद्र शील हे अपक्ष उमेदवार आहेत. शील हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गरीब उमेदवार आहेत. खवई जिल्ह्यातील कल्याणपूर-प्रमोदनगर मतदारसंघातून नागेंद्र शील रिंगणात आहेत. त्यांनी आपली मालमत्ता 1,200 रुपये असल्याचे घोषित केले आहे.
3. मृदुल कांती सरकार, अपक्ष: मृदुल कांती सरकार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मृदुल कांती सरकार हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गरीब उमेदवार आहेत. पश्चिम त्रिपुरातील बदरघाट (SC) जागेवरून कांती सरकार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी केवळ 2,000 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
मेघालयातील हे तीन गरीब उमेदवार आहेत
1. अरबियंगकम खरसोहमत, काँग्रेस: काँग्रेसच्या अरबियंगकम यांनी त्यांची संपत्ती केवळ 9,000 रुपये असल्याचे घोषित केले आहे. अमलरेम मतदारसंघातून निवडणूक लढवलेले अरबियंगकम हे मेघालय निवडणुकीत सर्वात गरीब उमेदवार होते.
2. थोसेनगचीबा ए संगमा, आरपीआय: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे थोसेनगचीबा ए संगमा हे गरीब उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रक्समग्रे मतदारसंघाचे उमेदवार संगमा यांच्याकडे 22 हजार रुपयांची संपत्ती आहे.
3. मार्क रिनाल्डी सॉकमी, भाजपा: मेघालयच्या गरीब उमेदवारांच्या यादीत भाजप उमेदवार मार्क रिनाल्डी सॉकमी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मूळ मैरांग येथील सोकमी यांनी त्यांची एकूण मालमत्ता 23,461 रुपये आहे.
नागालँडचे हे तीन गरीब उमेदवार आहेत
1. गामपाई कोन्याक, काँग्रेस: काँग्रेसच्या गामपाई कोन्याक यांनी त्यांची संपत्ती केवळ 5,251 रुपये असल्याचे घोषित केले आहे. गामपाई हे फोमिंग जागेवरून रिंगणात होते. कोन्याक हे नागालँडचे सर्वात गरीब उमेदवार आहेत.
2. चिंगसाक कोन्याक, एनपीएफ : एनपीएफचे चिंगसाक कोन्याक सर्वात गरीब उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 25 हजार आहे. चिंगसाक हे फोमिंग मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.
3. डॉ. चिंगो वालिम, अपक्ष: अपक्ष उमेदवार डॉ. चिंगो वालिम हे तिसरे गरीब उमेदवार आहेत. त्यांनी आपली संपत्ती 50,000 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तेहोक (एसटी) जागेवरून वलीम निवडणूक रिंगणात होते.
त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालयाच्या रिंगणात उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार कोण
ईशान्येतील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचे मतदान झाले असून आज निकाल गुरूवारी या तीन्ही राज्यांचे निकाल लागणार आहेत. तिन्ही राज्यामध्ये विविध पक्षांचे 818 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. यापैकी 441 उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे आहे तर बाकी अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आहेत.
या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे तीन राज्यातील 818 उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार आणि सर्वात गरीब उमेदवार कोण या चर्चेला उधाण आहे. यात विशेष करून शेकडो उमेदवारांची संपत्ती ही कोट्यवधींच्या घरात आहे. भाजप पक्षाच्या उमेदवारांकडे अमाप संपत्ती आहे. - येथे वाचा संपुर्ण बातमी.
ईशान्येतील 3 राज्यांचे निवडणूक निकाल:कलांमध्ये भाजपला नागालँडमध्ये बहुमत, त्रिपुरात चढ-उतार; मेघालयात NPP सर्वात मोठा पक्ष
ईशान्येतील विधानसभा निवडणुकीत त्रिपुरातील 60, मेघालयातील 59 आणि नागालँडमधील 60 जागांसाठीचे कल येत आहे. यात भाजप आघाडीला नागालँडमध्ये 46 आणि त्रिपुरामध्ये 35 जागा मिळताना दिसत आहेत. NPP 25 जागांसह मेघालयातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. एक्झिट पोलमध्येही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.