आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mehbooba Mufti, Jammu And Kashmir Special Status, Jammu And Kashmir Assembly Election

मेहबुबा मुफ्ती यांची मोठी घोषणा:जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही, पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष प्रमुखांची माहिती

जम्मू-काश्मीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (PDP) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सध्या कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. जोपर्यंत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल केला जात नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मेहबुबा म्हणाल्या की, राज्यातील लोकांसोबतच दुरावा कसा कमी करता येईल यावर केंद्रीय नेतृत्वाने विशेष लक्ष द्यावे.

पक्ष निर्णय घेईल
मेहबुबा म्हणाल्या, “मी केंद्रशासित प्रदेशांतर्गत कोणतीही निवडणूक लढवणार नाही, हे मी बर्‍याच वेळा स्पष्ट केले आहे, परंतु त्याचवेळी आम्ही कोणालाही राजकीय जागा घेण्यास परवानगी देणार नाही याची जाणीव माझ्या पक्षाला आहे. आम्ही गेल्या वर्षी जिल्हा विकास परिषद निवडणूक लढवली होती. अशाच प्रकारे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यास पक्ष बसून चर्चा करेल.

दडपशाहीचे युग संपवलेच पाहिजे
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यासाठी 5 ऑगस्ट 2019 रोजी दिलेला आदेश मागे घेण्याची मागणी मेहबुबा यांनी केली. त्या म्हणाल्या की जम्मू-काश्मीरमधील लोकांशी संबंध सुधारले पाहिजेत. मध्यवर्ती नेतृत्वाने त्यांची व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी पारित केलेल्या सर्व कठोर आदेशांची अंमलबजावणी थांबवावी लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये आजकाल दडपशाहीचे एक युग आहे. ते संपले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...