आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mehul Choksi Dominica Jail Update; Mehul Wife Preeti Choksi Attacks On Alleged Girlfriend Barbara Jabarika; News And Live Updates

मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड विरुद्ध पत्नी:प्रीती चोक्सी म्हणाली - माझ्या नवऱ्याला बदनाम केले जात आहे; कंटेंट बदलून व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज सहज तयार करता येतात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी सध्या डोमिनिकामधील तुरंगात आहे. मेहुल यांची कथित गर्लफ्रेंड बार्बरा जेबरिकाने दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर मेहुल चौक्सीवर आरोप केले आहेत. यावर मेहुलच्या पत्नी आपल्या नवऱ्याच्या बचावासाठी पुढे येऊन सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. माझ्या पतीला संबंधित प्रकरणात बदनाम केले जात असून बनावट ओळखपत्र आणि अपहरण केल्याचा दावादेखील खोटे असल्याचे त्या म्हणाल्या.

जबेरीकाचे आरोप आणि प्रीतीचे उत्तर
जेबरीका: मेहुलशी जेव्हा संभाषण सुरू झाले तेव्हा त्याने आपले नाव राज असे सांगितले होते.

प्रीती: एखादा लहान मुलगासुद्धा इंटरनेटवर आपल्या मित्रांच्या ओळखीची तपासणी करतो. गुगल आणि सोशल मीडियावर आपल्याला काही सेंकदात याची माहिती मिळू शकते.

जेबरिका: गेल्या वर्षी ऑगस्ट ते यावर्षीच्या एप्रिल दरम्यान मेहुल अनेकवेळा मॅसेज करत असे. परंतु, मी त्यांना एक दोनदा उत्तर दिले. पण यावर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यात आमच्या दोघांमध्ये हे संवाद वाढले.

प्रीती: व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरद्वारे सहजपणे बदलता येते. त्यामुळे जे मॅसेज व्हायरल होत आहे ते सत्य असल्याचा कोणताच पुरावा नाही.

जेबरिका: मेहुलने मला पुढच्या वेळी क्युबामध्ये भेटण्यास सांगितले होते. तो क्युबाला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.

प्रीती: तो खोटी माहिती देऊन आपली प्रतिमा डागळण्याचा धोका का पत्करेल? त्यामुळे माझ्या पतीची बदनामी करण्यासाठी खोटे दावे केले जात आहेत. ही एक राज्य (डोमिनिका) प्रायोजित योजना आहे जी चुकीची आहे.

जेबरिका कोणालाच आपले लोकेशन सांगत नाहीये. त्यामुळे आपल्याला त्याच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे मेहुल चौक्सीच्या पत्नीचे म्हणणे आहे.

हे आहे संपूर्ण प्रकरण?
मेहुल चौक्सी अँटिगा-बार्बुडा येथे राहत होता. परंतु, 23 मे रोजी तो अचानक बेपत्ता झाला आणि दोन दिवसांनंतर डोमिनिकामध्ये तो पकडला गेला. चोक्सीचा असा दावा आहे की, तो त्याची मैत्रीण बार्बरा जेबरिकासोबत होता. दरम्यान, त्याचे अपहरण करत मारहाण करण्यात आली. परंतु, सर्व घडामोडींमध्ये त्याची गर्लफ्रेंड जेबरिकाने त्याला कोणतीच मदत केली नाही. यामुळे तीदेखील त्या अपहरणात सामील असल्याचे चौक्सीचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...