आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mehul Choksi Extradition Update | Mehul Choksi Extradition, Fugitive Businessman Mehul Choksi, PNB Scam, Mehul Choksi, Antigua Prime Minister Gaston Browne

PNB घोटाळा:फरार मेहुल चौकसीला भारतात आणण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल, एक विशेष विमान डोमिनिकात दाखल

रोसियू/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताने एका विशेष विमानाने हस्तांतरणाचे डॉक्युमेंट्स डोमिनिकाला पाठवले

पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चौकसीला भारतात आणण्याच्या आशा वाढल्या आहेत. अँटीगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्राउन यांनी सांगितल्यानुसार, भारताने एका खासगी विमानाद्वारे डोमिनिका सरकारला चौकसीच्या हस्तांतरणाचे डॉक्युमेंट पाठवले आहे. चौकसी सध्या डोमिनिकातील तुरुंगात कैद आहे. दरम्यान, चौकसीबाबत भारत सरकारकडून अद्याप कुठलेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

चौकसी डॉमिनिकाच्या तुरुंगात कैद
नुकतंच 14 हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चौकसीचा डोमिनिकाच्या तुरुंगातून पहिला फोटो समोर आला आहे. तुरुंगात असलेल्या चौकसीने आकाशी रंगाचा टीशर्ट घातलेला दिसत आहे. तसेच, त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. विशेष म्हणजे, चौकसीच्या डोळ्याला आणि हाताला दुखापत झालेली दिसत आहे.

चौकसीने लावला अपहरण आणि मारहाणीचा आरोप

दोन दिवसांपूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोमेनिकामध्ये चौकसीचे वकील मार्श वेनने म्हटले की, त्याने चौकशीची तुरुंगात भेट घेतली होती. वकीलाने सांगितल्यानुसार, चौकसीने डोमिनिकामध्ये अपहरण करुन आणल्याचा आणि मारहाणीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी चौकसीचा वकील याचिका दाखल करणार आहे.

क्यूबाला पळून जाण्याच्या तयारीत होता चौकसी
चौकसी मंगळवारी(25 मे) डोमिनिकामध्ये पकडला गेला. अँटीगुआ मीडियाने आपल्यारिपोर्टमध्ये दावा केला आहे की, 62 वर्षीय चौकसी डोमिनिकामधून क्यूबामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, यादरम्यान CID ने त्याला पकडले. सूत्रांनी सांगितल्यानुसार, तो अँटीगुआ आणि बारबुडामधून बोटीद्वारे डोमिनिकामध्ये दाखल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...