आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mehul Choksi Indian Convoy Returns Empty handed Dominica Complicates Extradition

PNB घोटाळा:चोकसीला आणण्यासाठी गेलेला भारतीय चमू रिकाम्या हाती परतला, डॉमिनिकातील कोर्टामुळे प्रत्यार्पणात गुंतागुंत

नवी दिल्ली/सँटो डोमिंगो15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसी याला आणण्यासाठी गेलेले भारतीय अधिकाऱ्यांचे पथक डॉमिनिकातून रिकाम्या हाताने परतले आहे. सूत्रांनी सांगितले की, भारतीय पथक कतार एअरवेजच्या खासगी विमानाने परतले आहे. हे विमान डॉमिनिकाच्या स्थानिक वेळेनुसार तीन जूनच्या रात्री ८.१० वाजता रवाना झाले. ते माद्रिदमार्गे गेले आहे. डॉमिनिकातून भारतासाठी थेट विमानसेवा नाही. तेथून भारतात पोहोचण्यास २४ ते २६ तास लागतात.

त्याआधी डॉमिनिकाच्या हायकोर्टाने गुरुवारी चोकसीची जामीन याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवरील सुनावणीही स्थगित केली. पुढील सुनावणी जुलैत होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने चोकसीला अवैधरीत्या डॉमिनिकात प्रवेश करण्याच्या प्रकरणात आधी मॅजिस्ट्रेट कोर्टात उत्तर देण्याचे निर्देश दिले. या घटनाक्रमानंतर चोकसीला भारतीय चमूकडे सोपवण्याचे प्रकरण गुंतागुंतीचे झाले. तथापि, डॉमिनिका सरकार त्याला भारताकडे सोपवण्याच्या बाजूचे होते. या घटनाक्रमानंतर भारतीय पथकाला परत यावे लागले. सीबीआयच्या उपमहानिरीक्षक शारदा राऊत यांच्या नेतृत्वातील हे पथक सात दिवसांपासून डॉमिनिकात होते.

बातम्या आणखी आहेत...