आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mehul Choksi Latest News Update | Narendra Modi Government, Mehul Choksi Offer, Mehul Choksi Offer To India

मेहुल चौकसीची ऑफर:भारतीय अधिकाऱ्यांनी डोमिनिका येथे येऊन हवे ते प्रश्न विचारावेत, मी केवळ उपचारांसाठी देश सोडला आहे

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कस्टडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसीने भारताला ऑफर दिली आहे. त्याने भारतीय अधिकाऱ्यांना डोमिनिका येथे येण्यास आणि त्याच्या तपासासंदर्भात कोणतेही प्रश्न विचारण्यास सांगितले आहे. केवळ उपचारांसाठी भारत सोडल्याचा दावा चौकसीने केला आहे. तो कायदा पाळणारा नागरिक आहे. डोमिनिका उच्च न्यायालयात पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रात चौकसीने या गोष्टी सांगितल्या आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चौकसीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, माझ्याविरूद्ध केलेल्या कोणत्याही तपासासंदर्भात भारतीय अधिकारी प्रश्न विचारू शकतात. मी त्यांना येथे येऊन प्रश्न विचारण्याची ऑफर देतो. मी भारतातील कोणतीही एजन्सी टाळण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा मी अमेरिकेत उपचारांसाठी भारत सोडत होतो, तेव्हा कोणत्याही एजन्सीने माझ्याविरूद्ध वॉरंट काढला नव्हता.

चौकसीने प्रतिज्ञापत्रात सांगितल्या या गोष्टी

  1. डोमिनिकामधील न्यायालयीन कार्यवाही टाळण्याचा माझा कोणताही हेतू नाही. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यामुळे माझ्या सुटण्याची कोणतीही शक्यता नाही. रेड कॉर्नर नोटीसचा कोणताही इंटरनॅशनल वॉरंट नसतो, ती फक्त एक अपील असते, जी सरेंडरसाठी असते.
  2. मला शोधून काढा आणि भारताला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन इंटरपोलने भारताच्या वतीने केले आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. डोमिनिका सोडण्याचा माझा हेतू नाही.
  3. होय, मला कोर्टाच्या परवानगीने अँटीगुआ येथे जायचे आहे. माझ्याविरूद्ध अँटीगुआ आणि बारबूडा येथे दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. मी स्वत: हे खटले दाखल केले आहेत. ते खटले मला भारतात प्रत्यार्पण करावे की नाही याबद्दलचे आहेत. मी अँटीगुआ कोर्टात प्रत्येक सुनावणीत उपस्थित राहिलो आहे. मी कायदा पाळणारा नागरिक आहे. यापूर्वी माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत.
  4. मला भीती वाटते की मी पोलिसांच्या ताब्यात राहिल्यास, माझी तब्येत आणखी खालावेल. मी 62 वर्षांचा आहे आणि मला आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. मला मधुमेह आहे, माझ्या मेंदूमध्ये गुठळी आहे, हृदयविकाराचा त्रास आहे आणि इतर समस्या देखील आहेत. मला जामीन देण्यात यावा.
  5. जर कोर्टाचे म्हणणे असेल तर मी रोख रक्कमेसाठी जास्तीत जास्त रक्कम देऊ शकतो. मी माझ्या विरोधात चुकीच्या पध्दतीने एंट्रीचे प्रकरण संपेपर्यंत येथे राहिल, पळून जाणार नाही. मी येथे राहण्याचा खर्चही उचलेल. मी माझ्या सुरक्षेचा खर्चही उचलू शकतो, मला डोमिनिकाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा नको आहे.

डोमिनिका पोहोण्यापूर्वी अँटीगुआमध्ये राहत होता चौकसी
मेहुल चौकसी अँटीगुआचे नागरिकत्व घेऊन 2018 पासून तेथेच राहत होता. मात्र 23 मेला अचानक तेथून बेपत्ता झाला होता. याच्या 2 दिवसांनंतर त्याला डोमिनिकामधून ताब्यात घेण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये अँटीगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउनचे एक पत्रही समोर आले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, मेहुलने नागरिकत्त्वासंबंधीत माहिती लपवली होती.

14 ऑक्टोबर 2019 ला लिहिलेल्या पत्रामध्ये ब्राउन यांनी म्हटले होते, 'मी अँटीगुआ आणि बारबूडा नागरिकता अधिनियम, कॅप 22 च्या कलम 8 नुसार एक आदेश देण्याचा प्रस्ताव ठेवतो, जेणेकरुन तथ्य मुद्दामून लपवण्याच्या आधारावर अँटीगुआ आणि बारबूडा आणि नागरिकतेपासून वंचित केले जाऊ शकेल.'

कस्टडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले
चौकसीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे, परंतु त्याने त्याच्या कस्टडीला उच्च न्यायालयात आव्हान केले आहे. चौकसीचा असा दावा आहे की त्याला अँटिगुआ-बार्बुडा येथून अपहरण करुन डोमिनिकामध्ये आणले गेले. खरेतर, सरकारी वकील यांनी चौकसीच्या दाव्याला विरोध दर्शवित असे म्हटले आहे की, तो बेकायदेशीरपणे डोमिनिकामध्ये दाखल झाला आहे आणि त्याला या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होता.

बातम्या आणखी आहेत...