आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Member Of Niti Aayog V K Paul Comment On Report Of Newyork Times; News And Live Updates

न्यूयॉर्क टाइम्सचा दावा:भारतातील कोरोनाच्या मृत्यूंबाबतचा अहवाल तथ्यहीन : केंद्र सरकार; 6 ते 42 लाख मृत्यूंचा वृत्तपत्राने व्यक्त केला होता अंदाज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंदाज मांडताना दिलेला आधार चुकीचा

न्यूयॉर्क टाइम्सने भारतातील मृत्यूंबाबत प्रसिद्ध केलेला अहवाल तथ्यहीन असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ‘जस्ट हाऊ बिग कुड इंडियाज ट्रू कोविड टोल बी’ या शीर्षकाखाली या वृत्तपत्राने सामान्य स्थितीत भारतात ६ लाख आणि वाईट स्थितीत १६ लाख तर अतिशय वाईट स्थिती म्हटले तर ४२ लाख मृत्यू झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, हा अहवाल चुकीचा, तथ्यहीन आहे. कोरोनाचे मृत्यू लपवण्याचा प्रश्नच नाही. कोरोना रुग्ण आणि मृत्यू पारदर्शकतेनेच समोर आले पाहिजेत.

दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल म्हणाले, बातमी तथ्यहीन आहे. संसर्गाच्या तुलनेत एक निश्चित दर मानला तर विश्लेषणात ही समस्या निर्माण होते. सिरो सर्व्हेनुसार संसर्गाचा दर ०.०५ टक्के आहे. वास्तविक मृत्युदर १.१ असून अहवालात मृत्युदर ०.३ टक्के नमूद आहे. ही मूळ दरापेक्षा सहापट आहे, असा अंदाज मांडला तर न्यूयॉर्कमध्ये फक्त मे महिन्यातच ५० हजार मृत्यू झाले असतील. याच्या सहापट म्हणजे मृतांची संख्या ९० हजार, बारा पट केली तर पावणेदोन लाख असेल. तरी त्यांच्या मते मृत्यू १६ हजारच आहेत.

अंदाज मांडताना दिलेला आधार चुकीचा
कोणत्या आधारे या समूहाने मृत्युदर ०.३%,०.१५% आणि ०.६% मानला? भारतात हा मृत्युदर मोजणारी सशक्त यंत्रणा आहे. जेथे चाचण्या नाहीत तेथे मृत्यू अधिक असू शकतात. मात्र, कोणताही आधार नसताना मांडलेली ही आकडेवारी आम्ही स्वीकारू शकत नाही, असे पॉल यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...