आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Members Of Rajini Makkal Mandram Free To Join Other Parties; Announcement Of Rajinikanth's Organization

रजनीकांतच्या संघटनेची घोषणा:आमचे सदस्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्यास स्वतंत्र आहेत, परंतु आपण रजनीकांतचे चाहते आहात हे विसरू नका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांत यांनी डिसेंबरमध्ये निवडणूक राजकारणापासून दूर राहून लोकांची सेवा करण्याची घोषणा केली होती- फाइल फोटो. - Divya Marathi
रजनीकांत यांनी डिसेंबरमध्ये निवडणूक राजकारणापासून दूर राहून लोकांची सेवा करण्याची घोषणा केली होती- फाइल फोटो.
  • रजनीकांत यांनी डिसेंबरमध्ये निवडणूक राजकारणापासून दूर राहून लोकांची सेवा करण्याची घोषणा केली होती

रजनीकांत यांच्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याच्या निर्णयानंतर आता त्यांची संघटना रजनी मक्कल मंदराम (RMM) यांनी आपल्या सदस्यांना म्हटले की ते RMM सोडून इतर कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ शकतात. RMM नेता व्ही एम सुधाकर यांच्याकडून सोमवारी हे निवेदन जारी केले. तसेच राजीनामा देणाऱ्या RMMच्या नेत्यांनी हे विसरू नये की ते रजनीकांतचे चाहते आहेत, असेही ते म्हणाले. याआधी RMM च्या अनेक जिल्हा प्रमुखांनी रविवारी द्रविड मुनेत्र कडगम (DMK) पक्षात प्रवेश केला.

रजनी यांनी दबाव निर्माण न करण्याची केली विनंती

मागील आठवड्यात रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना विनंती केले होती की, राजकारणात येण्यासाठी दबाव टाकू नये. तामिळ भाषेत प्रसिद्ध झालेल्या आपल्या निवेदनात त्यांनी लिहिले की, ''मी राजकारणात का येत नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. कृपया मला पुन्हा त्रास देऊ नका आणि असे कार्यक्रम आयोजित करून मला राजकारणात येण्यास सांगू नका."

रजनीकांत यांनी डिसेंबरमध्ये निर्णय घेतला होता

29 डिसेंबर रोजी रजनीकांत यांनी प्रकृती अबाधित असल्याचे सांगून स्वत: ला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवण्याची घोषणा केली. त्यांनी तमिळमध्ये एक निवेदन जारी करत म्हटले होते की, ''निवडणूक न लढवताही लोकांची सेवा करणार आहे. या निर्णयामुळे चाहते निराश होतील, पण मला माफ करा."

बातम्या आणखी आहेत...