आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रारायसीना डायलॉग 2023:‘क्वाड’चा संदेश : चीनने आंतरराष्ट्रीय कायदा पाळावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रारायसीना डायलॉग २०२३ प्रसंगी ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची शुक्रवारी बैठक पार पडली. सर्व परराष्ट्रमंत्र्यांनी स्वतंत्र व मुक्त हिंद-प्रशांतसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता व वादांचे शांततेने निकारण करण्यास समर्थन असल्याचे म्हटले. हा चीनला अप्रत्यक्ष संदेश असल्याचे याकडे बघितले जात आहे.

जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी म्हणाले, क्वाड हा लष्करी गट नाही. आम्ही कोणालाच (चीनसह) बाहेर करण्याचा प्रयत्न करत नाही. जोपर्यंत चीन अंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करेल तोपर्यंत तो विरोधी मुद्दा नाही. यानंतर बिजिंगमधील चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, आम्ही क्वाडवरील स्थिती अनेकदा स्पष्ट केली आहे. राज्या-राज्यांतील संवाद शांतता व विकासासोबत वाढवला पाहिजे आणि परस्पर विश्वास व प्रादेशिक स्थैर्यात योगदान दिले पाहिजे, असे आम्हाला वाटते. दरम्यान, क्वाड सदस्यांनी एका सुरात २६/११ च्या मुंबई हल्ल्यासह अतिरेकी हल्ल्यांचा निषेध केला.

संयुक्त वक्तव्यात त्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी सागरी देखरेखीवरील सहकार्य मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. दहशतवादाच्या उदयोन्मुख स्वरूपाचा सामना करण्याच्या उपायांचा शोध घेण्यासाठी दहशतवाद-विरोधी क्वाड वर्किंग ग्रुप बनवण्याबाबतही सहमती झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...