आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Meteorological Department Will Release The Forecast Of Long Term Monsoon Today, It Was Expected To Rain 96% Last Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगली बातमी:हवामान विभागाचा अंदाज - सलग दुसऱ्या वर्षी देशात सरासरी गाठणार मान्सून, यंदा 100% पाऊस

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागच्या वर्षी मानसून केरळच्या समुद्र किनाऱ्यावर 8 दिवस उशीराने 8 जूनला आला होता
  • मान्सूनचे आगमन-परतीच्या वेळापत्रकात पहिल्यांदाच बदल
  • औरंगाबाद, नाशिक, सोलापुरात १५ दिवस जास्त राहणार पावसाळा

अनिरुद्ध शर्मा

कोरोनाच्या संकटात बुधवारी दिलासा देणारे वृत्त आले. हवामान विभागानुसार, यंदा मान्सून सरासरी गाठेल. यंदा दीर्घकालीन सरासरीच्या १०० टक्के पाऊस होईल. हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी सांगितले की, मान्सून केरळात एक जूनला दाखल होईल. मागील वर्षी तो ८ दिवस विलंबाने आला होता. प्रशांत महासागरात अल निनोची स्थिती आणि हिंदी महासागरातील आयओडीची स्थिती सामान्य आहे. मान्सूनच्या काळात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी पाऊस होतो. सलग दुसऱ्या वर्षी सरासरीइतक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

नैऋत्य मान्सूनचे नवे वेळापत्रक एक जून २०२० पासून लागू होणार

अजय कुलकर्णी / औरंगाबाद : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पहिल्यांदाच नैऋत्य मान्सूनच्या आगमन आणि परतीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार, देशातील अनेक राज्यांत आता मान्सूनचे आगमन सध्याच्या तुलनेत ३ ते ७ दिवस उशिराने होणार आहे, तर मान्सूनच्या परतीचा प्रवासही ७ ते १४ दिवसांच्या विलंबाने होणार आहे. असे असले तरी केरळातील मान्सूनच्या आगमनाची तारीख एक जूनच राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. नवे वेळापत्रक एक जून २०२० पासून लागू होणार आहे. 

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात ३ ते ७ दिवस विलंबाने पोहोचणार पाऊस 

  • नव्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि बिहार आदी राज्यांत मान्सूनचे आगमन सध्याच्या वेळांच्या तुलनेत ३ ते ७ दिवस विलंबाने होणार आहे.
  • सध्याच्या वेळानुसार १५ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो, नव्या वेळांनुसार आता ८ जुलैपर्यंत तो देश व्यापेल.
  • या वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती आयएमडी १५ मे २०२० रोजी जारी करणार आहे.

हवामान बदलामुळे वेळापत्रकात बदल

मान्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळांत प्रथमच बदल करण्यात आला आहे. हवामान बदल हे या वेळांत बदल करण्यामागचे मुख्य कारण आहे. मागील ५० वर्षांत झालेले अनेक बदल व त्यानुसार डेटावर आधारित नवे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, हवामानप्रमुख, आयएमडी, पुणे 

दोन टप्प्यात ठरतो अंदाज

दरवर्षी हवामान विभाग दीर्घकाळ अंदाज दोन टप्प्यात जारी केला जातो. पहिला अंदाज एप्रिल तर दुसरा अंदाज जूनमध्ये जारी केला जातो. यासाठी स्टेटिसटिकल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टीम आणि ओशन एटमॉस्फिरिक मॉडलची मदत घेतली जाते. 1961 ते 2010 दरम्यान दरवर्षी भारतात अंदाजे 88 सेमी पाउस पडत आला आहे.

बातम्या आणखी आहेत...