आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखाची वाहतूक:25 लाख लाेकसंख्येच्या शहरांत आता मेट्रो लाइट-मेट्रो नियो

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 शहरांत मेट्राेची कामे, आता काेणताही नवीन प्रस्ताव मंजूर हाेणार नाही

देशात सार्वजनिक वाहतुकीसाठी शहरांमध्ये आता मेट्राे आवडीची ठरत आहे. तरी केंद्र सरकार यातील खर्च पाहता नवीन प्रकल्पांना मंजुरी देणार नाही. याएेवजी १० ते २५ लाख लाेकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मेट्राे लाइट आणि मेट्राे नियाे चालवल्या जातील.

देशात सध्या २७ शहरांमध्ये मेट्राे रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. दिल्ली, जयपूरसह १८ शहरांमध्ये सुमारे ७१७ किलाेमीटर मार्गांवर मेट्राेचे काम सुरू आहे. तर, १००१ किलाेमीटर लांबीचा रेल्वेमार्ग आगामी पाच वर्षात पूर्ण हाेईल.

वास्तविक एक किलाेमीटर आेव्हरहेड मेट्राेवर जवळपास ३५० काेटी, भूमिगत मेट्राेवर ६०० ते ८०० काेटी आणि सपाट जमिनीवर प्रति किलाेमीटर २०० काेटी रुपये खर्च येताे. अशामध्ये माेठ्या शहरात मेट्राे चालू शकते. पण लहान शहरात खर्चाचे माेठे आव्हान आहे. त्या तुलनेत मेट्राे लाइटसाठी ४०% आणि मेट्राे नियाेसाठी २०% खर्च येताे. मेट्राेतून तासाला ५० हजार प्रवासी प्रवास करू शकतात. तर मेट्राे लाइट आणि मेट्राे नियाेची प्रवासी वाहतूक क्षमता १५ हजार आहे. लहान शहरांमध्ये इतकीच वाहतूक असते.

बातम्या आणखी आहेत...