आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेट्रोमॅन नावाने प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन यांना भाजपमे केरळमध्ये आपला अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. केरळ भाजपाध्यक्ष सुरेंद्रन यांनी याबाबत माहिती दिली. 88 वर्षीय श्रीधरन 6 दिवसांपूर्वीच मलप्पुरममध्ये केंद्रीय मंत्री आरके सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाले होते. श्रीधरन यांनी आपला गृह जिल्हा मलप्पुरममधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 140 सदस्य असलेल्या केरळ विधानसभेसाठी 6 एप्रिलला मतदान होणार असून, 2 मे रोजी निकाल जाहीर होतील.
श्रीधरन म्हणाले- शारिरीक नव्हे तर मानसिक वय महत्वाचे
श्रीधरन बुधवारी पलारीवट्टममध्ये बनत असलेल्या फ्लायओव्हरची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळे ते म्हणाले की, 'केरळची जनता यावेळेस भाजपचे सरकार स्थापन करेल. भाजप मोठा विजय मिळवेल, अशी मला आशा आहे. मी भाजपकडे एक विनंती केली आहे की, मी पोन्नानीचा असल्यामुळे मला पोन्नानीमधून निवडणूक लढवू द्यावी.'
त्यांच्या वयावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर श्रीधरन म्हणाले की, 'शारिरीक नव्हे तर मानसिक वय महत्वाचे. मानसिकरित्या मी खूप अलर्ट आणि तरुण आहे. मला कुठलाही आजार नाही. मला वाटत नाही की, आरोग्य खूप मोठा मुद्दा आहे. मी इतर नेत्यांप्रमाणे नाही, तर टेक्नोक्रेटप्रमाणे काम करेल.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.