आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Metro Train Service Unlock 4 Guidelines Rules Update Latest News | Urban Affairs Minister Hardeep Singh Puri Today Issue SOPs For Metro Train Service

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक-4:केंद्र सरकारकडून दिल्ली मेट्रोसाठी गाइडलाइन्स जारी; परंतू महाराष्ट्रातील मेट्रोला तुर्तास राज्य सरकारकडून रेड सिग्नल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून मेट्रो सर्विस बंद आहे, 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरू होणार

कोरोना काळात येत्या 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मेट्रो सर्विससाठी केंद्र सरकारने आज गाइडलाइंस जारी केल्या.महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीतील मेट्रो सेवा एका दिवसात दोन शिफ्टमध्ये धावेल. याला तीन फेजमध्ये सुरू केले जाईल. यादरम्यान, पाच तासांचा ब्रेक असेल, यात सॅनिटायजेशनचे काम होईल. मेट्रो प्रवास फक्त स्मार्ट कार्डद्वारे करता येईल, टोकन दिले जाणार नाही.

स्मार्ट कार्डसाठी केले जाणारे पेमेंटदेखील कॅशलेस किंवा ऑनलाइन असेल. कोरोनामुळे मेट्रो सर्विस मार्चपासून बंद आहे. गृह मंत्रालयाने मागच्या आठवड्यात अनलॉक-4 च्या गाइडलाइंस जारी करत 7 सप्टेंबरपासून फेज्ड मॅनरमध्ये मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी शहरी प्रकरणांच्या मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी मेट्रो कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर्ससोबत चर्चा केली.

महाराष्ट्रात मेट्रोला रेड सिग्नल

दरम्यान, महाराष्ट्रातील मेट्रोला अद्याप राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यांपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे एका महिन्यानंतरच मेट्रोबाबत निर्णय होईल.