आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • MetroMan E Sreedharan Soon Join BJP News Udpate | Here's All You Need To With Latest Details

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मेट्रोमॅन'ची राजकारणात एंट्री:मेट्रोमॅन नावाने ओळखले जाणारे ई श्रीधरन यांचा लवकरच भाजप प्रवेश; प्रदेशाध्यश्र के सुरेंद्रन यांची माहिती

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरेंद्रन म्हणाले- आम्ही त्यांना निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे

केरळमध्ये भाजपकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रोमॅन नावाने ओळखले जाणारे ई श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळचे भाजपाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. राज्यात या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे श्रीधरन भाजपमध्ये आल्यावर पक्षाला मोठा फायदा होईल. श्रीधरन, सुरेंद्रन यांच्या नेतृत्वात 21 फेब्रुवारीपासून काढण्यात येणाऱ्या विजय यात्रेदरम्यान अनेकजण पक्षात सामील होणार आहेत.

सुरेंद्रन यांनी सांगितले की, श्रीधरन यांनी भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय यात्रा मलप्पुरममध्ये दाखल झाल्यानंतर ते पक्षात सामील होतील. मलप्पुरम श्रीधरन यांचा गृह जिल्हा आहे. सुरेंद्रन पुढे म्हणाले की, श्रीधरन यांनी विधानसभा निवडणूक लढावी, ही आमची इच्छा आहे. आम्ही त्यांना तसा प्रस्ताव दिला आहे, परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळाले नाही.

7 वर्षे दिल्ली मेट्रोचे संचालक होते श्रीधरन

88 वर्षीय श्रीधरन भारतातील प्रसिद्ध सिव्हील इंजीनिअर आहेत. ते 1995 ते 2012 पर्यंत दिल्ली मेट्रोचे संचालक होते. भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना देशातील पब्लिक ट्रांसपोर्टमध्ये मोठे बदल करण्यासाठी ओखळले जाते.