आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसेवाला हत्याकांड:रेड कॉर्नर नोटीसआधी, म्होरक्या गोल्डी कॅनडाच्या 25 मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट

दिव्य मराठी नेटवर्क | दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या किंगपिनसह भारतातील अनेक निर्घृण गुन्ह्यांचा आरोपी सतींदरजित सिंग गोल्डी ब्रार याला कॅनडाच्या २५ मोस्ट वाँटेड फरारींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. इंटरपोल-ओटावाच्या फ्युजिटिव्ह अॅप्रेहेन्सिव्ह सपोर्ट टीम-फास्टने सोमवारी ब्रारचे नाव मोस्ट वाँटेड फरार आरोपींच्या यादीत समाविष्ट केले.

त्यामुळे त्याला कॅनडात अटक होण्यास मदत होणार आहे. एखाद्या व्यक्तीने कॅनडात गुन्हा केला आहे किंवा त्याच्याविरुद्ध कॅनडात अटक वॉरंट जारी केले असेल तर कॅनडात अटक होऊ शकते. इंटरपोलकडून गोल्डीला रेड नोटीस जारी करण्यात भारताला यश आले होते.

कॅनडात चौकशी
कॅनडाच्या नवी दिल्लीस्थित उच्चायुक्ताने सांगितले की, भारतात झालेल्या गुन्ह्यांत कॅनडातील पोलिस ब्रारविरुद्ध चौकशी करत आहेत. तो कॅनडात असून सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोका ठरल्याचे सांगण्यात येत आहे.