आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Midnight Harassment In Delhi; Deleted The Videos In The Mobile Phone, Broke The SIM Card And Beat Him Up

नोकरीसाठी निघालेल्या मुलींना पोलिसांनी उचलले:दिल्लीत मध्यरात्री छळ; मोबाइलमधले फोटो- व्हिडीओ केले डिलिट, सिमकार्ड तोडून मारहाण

दीप्ति मिश्रा| नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसएससी जीडी 2018 अंतर्गत पॅरा मेडिकल फोर्सेससाठी लेखी, शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या उत्तीर्ण झालेल्या 35 मुलींसह 160 उमेदवार नियुक्ती पत्रांच्या मागणीसाठी 62 दिवस पायी मोर्चा काढला आहे. जंगल-डोंगर, कडक ऊन, पाऊस, खडकाळ रस्ता आणि प्रशासनाचा गैरव्यवहार अशा सगळ्या त्रासांना तोंड देत हे बेरोजगार 27 जुलैला हरियाणातील पलवल येथे पोहोचले. जिथे पहिले तीन दिवस थांबून पोलिसांनी यांना त्रास दिला. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी उशिराने त्यांना जबरदस्तीने बसमध्ये डांबून ठेवून, पोलिस तेथून पळून गेले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींशी गैरवर्तन देखील केले. तसेच या लोकांचे सिमकार्ड तोडून टाकले. असे असताना त्यांचा फोन व सोशल मीडीयावर असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले.

नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढणाऱ्या शंकर मधुकर ढोके या बेरोजगारांपैकी एकाने भास्करच्या रिपोर्टरशी दुपारी 12.25 वाजता संपर्क साधला. यावेळी शंकरसह त्याचे सर्व साथीदार खूप घाबरले होते. शंकरने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर लाईव्ह लोकेशन शेअर करून मेसेजमध्ये लिहिले, आम्ही आता बसमध्ये आहोत. आम्हाला कुठे नेले जात आहे, हे आम्हाला कळत नाहीए.

पोलिसांसोबत गेलेल्या 6 साथीदारांशी संपर्क होऊ शकला नाही

शंकर म्हणाले, 'आम्ही सर्वजण 27 जुलैला पलवलला पोहोचलो. पलवल पोलिसांनी आमच्या सहा साथीदारांना – पश्चिम बंगालची काजल, छत्तीसगडची अमिता, महाराष्ट्रातील विशाल लांडगे आणि कडुबा राठोड, ओडिशातील भीष्मराज आणि आसामची सुसान टॉय दिल्लीत यांच्या पत्रकार परिषदेसाठी नेले होते, पण तेव्हापासून आमच्या साथीदारांसोबत संपर्क नाही झाला. असे असताना आम्ही तिथल्या लोकांना विचारले, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. आम्ही पोलिसांनी हजार वेळेस विचारले. पण ते देखील काही बोले नाही. आम्ही आमच्या साथीदारांशी बोलण्याची विनंत केली, पण पोलिसांनी आमच्या साथीदारांबद्दल कोणतीच माहिती दिली नाही.

नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढताना बेरोजगार तरुण.
नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढताना बेरोजगार तरुण.

मुलींवर उचलला हात, पोलिसांच्या वागणुकीला आम्ही घाबरतो

शंकर म्हणाला 'आम्ही खाणे-पिणे बंद केले. जोपर्यंत आमच्या लोकांसोबत कोणताच संपर्क होत नाही, तोवर आम्ही इथून उठणार नाही व काहीच खाणार पण नाही. पण पोलिसांनी त्यांना जबरदस्ती करून आणि धमकावून जेवण करायला भाग पाडले. तब्बल 62 व्या दिवशी पोलिसांनी आमच्या लोकांना ताब्यात घेतले केली आणि पलवलपासून 7 किलोमीटच्या अंतरावर असलेल्या तिनवारी रॉयल पॅलेसमध्ये आणून सोडले. तसेच इथे असलेल्या पोलिसांनी आम्हाला धमकावून खाण्या-पिण्यास भाग पाडले. पण मुलींनी जेवणासाठी नकार दिला, तेव्हा पोलिसांनी त्या मुलींच्या आंगावर हात उचलायला मागेपुढे पाहिले नाही.

सोमवारी 1 ऑगस्टला उशिरा आम्हा सर्वांना जबरदस्तीने बसमध्ये बसवण्यात आले आणि त्यानंतर आम्हाला यमुना एक्सप्रेसवेने आग्रा येथे नेण्यात आले. आम्ही सर्व आमच्या 6 साथीदारांच्या काळजीत होतो.बसमध्ये चढत असतानाही आम्ही पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्याची विनंती केली. आमच्या साथीदारांना आमच्याकडे परत पाठवा, त्यानंतर आम्ही परत येऊ, असेही त्यांना सांगितले. असे असूनही त्यांनी आमच्या साथीदारांची कोणतीही माहिती दिली नाही. आम्ही सगळे घाबरलो होतो.

नागपुरातून बाहेर पडलेले हे तरुण काही दिवसांपूर्वी दिल्लीला लागून असलेल्या पलवलमध्ये पोहोचले होते.
नागपुरातून बाहेर पडलेले हे तरुण काही दिवसांपूर्वी दिल्लीला लागून असलेल्या पलवलमध्ये पोहोचले होते.

पायी मोर्चा का काढला जातोय?

मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या विशालने सांगितले की, 2018 मध्ये पॅरा मिलिटरी फोर्समध्ये एसएससी जीडी अंतर्गत 60,210 पदांसाठी भरती करण्यात आली होती. आम्ही लेखी, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालो, पण आम्हाला नियुक्तीपत्र मिळाले नाही. सरकारने केवळ 55 हजार पदे भरली. फेब्रुवारी 2021 पासून आम्ही दिल्लीत निदर्शने सुरू केली. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटायचे होते, पण त्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. आमचे सहकारी दिल्लीतील सर्व खासदारांच्या कार्यालयात गेले आणि तेथे जाऊन मदती केली. दरम्यान, कोणीतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटण्याचे सांगितले, ते तुमची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवू शकतात.

फक्त आश्वासन मिळाली, रोजगार नाही

आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिले. 15 दिवसांत नियुक्तीपत्र मिळण्याची हमी त्यांनी दिली. 20 दिवस उलटूनही नियुक्तीपत्रे मिळाले नाही आणि गडकरींची भेट पण झाली नाही. त्यानंतर नागपुरातील संविधान चौकात 72 दिवस उपोषण केले. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आमच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. व लवकरच नियुक्ती दिली जाईल, असे आश्वासन दिले. जवळपास दीड महिना उलटून गेल्यावर आमच्या मुलींसह काही सहकारी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत केंद्रीय मंत्री आठवले यांच्या कार्यालयात पोहोचले. व तेथे त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले. बाहेर देखील काढण्यात आले. असे असताना आम्ही नागपूर ते दिल्ली पायी पदयात्रा काढण्याचे ठरवले.

एसएससी जीडी 2018 चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्ती पत्र प्राप्त झाले नाही.
एसएससी जीडी 2018 चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्ती पत्र प्राप्त झाले नाही.

मोर्चात सुरुवातील 4 मुली होत्या

नागपूरच्या संविधान चौकात 1 जूनला 40 मुलींसह 40 बेरोजगार तरुणांनी पायी मार्चा काढला. हळूहळू देशभराती मुले-मुली या पायी मार्चात सहभागी झाले. तसेच या पायी मोर्चामध्ये 35 मुलींसह 160 हून अधिक बेरोजगार तरुण आहेत.

पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील रहिवासी रुपाली हिमरान म्हणाल्या, “गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही भुकेले आणि तहानलेले आहोत. खायला धान्य नाही की झोपायला जागा नाही. कधी कधी प्यायलाही पाणी नसते. मध्य प्रदेशातील सागरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आम्हाला तेथे खाण्या पिण्यासाठी राहू दिले नाही. 49 अंश पारा असताना लोकांना न थांबता चालत राहण्याचे सांगण्यात आले. आग्रा पोलिसांनी आम्हाला आधी गुरुद्वारात थांबवले आणि नंतर आम्हाला ढोलपूर, मुरैना, शिकोहाबाद आणि इटावा येथे नेऊन सोडले. आमच्या सोबत्यांचे मोबाईलही हिसकावून घेतले आणि परत कधीही उत्तर प्रदेशात न येण्याचा सांगितले. आम्ही मथुरेत पोहोचलो तेव्हा तेथील पोलिसांनीही आमच्याशी गैरवर्तन केले. दिवसभर उन्हात बसून ठेवले. त्यामुळे दोन मुलींची प्रकृती खालावली.

रुपाली म्हणाली, आपल्या हक्कासाठी लढताना आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आहोत. पायावर फोड आलेत. शरीराचा प्रत्येक अवयव वेदनेने दुखत होता. लहानपणापासून आपलं एक स्वप्न असतं की, आपण देशासाठी काहीतरी करावे, पण आपल्याच देशाने परके केले. हे सगळे झाल्यावर मला असे वाचटे की, मी एक स्वप्न पाहिले.

बातम्या आणखी आहेत...