आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Midnight Oxygen Supply Ends In Galaxy Hospital, Staff Including Doctors Fled From The Scene After An Uproar Over The Death Of Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक घटना:ऑक्सिजन कमी झाल्याने 5 रुग्णांचा मृत्यू; रुग्णांना तशाच अवस्थेत सोडून डॉक्टर पळून गेले

जबलपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांना सूचना मिळताच ऑक्सीजन सिलेंडर आणले

मध्यप्रदेशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूचे सत्र सुरुच आहे. जबलपुरमध्ये 8 दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. येथील उखरी रोडवरील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री 5 कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. यात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्यामुळे रुग्ण तडफडू लागले, तेव्हा ड्युटीवरील डॉक्टर आणि स्टाफ पळून गेले. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि काही सिलेंडरची व्यवस्था करतुन परिस्थिती सांभाळली. या संपूर्ण घटनेमुळे नाराज कुटुंबियांनी हॉस्पिटलबाहेर प्रचंड गोंधळ घातला.

गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये 65 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू होता. यातील 31 ऑक्सीजनवर होते आणि ICU मध्ये एकूण 34 रुग्ण भरती होते. या धक्कादायक घटनेत अमित कुमार शर्मा (42), गोमती राय(65), विमला तिवारी (48), आनंद शर्मा आणि देवेंद्र कुमार (58) यांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेनंतर समोर आले की, हॉस्पिटलने त्यांच्याकडे ऑक्सीजनचा बॅकअप ठेवला नव्हता.

रुग्णांचा मृत्यू आणि डॉक्टरांच्या पळून जाण्यानंतर नाराज कुटुंबियांनी हॉस्पिटलबाहेर प्रचंड गोंधळ घातला आणि पोलिसांना सूचना दिली. यानंतर CSP दीपक मिश्रासह कोतवाली, लार्डगंज, विजय नगर, मदनमहल, अधारताल पोलिस स्टेशनमधील पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या एका टीमने ऑक्सीजन सिलेंडर आणले. यानंतर रात्री तीन वाजता हॉस्पिटलचा ऑक्सीजन सप्लाय सुरू झाला.

बातम्या आणखी आहेत...