आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Midnight Oxygen Supply Stuck In JP's Kovid Ward, 2 Patients Died; Mp Jp Hospital News And Live Updates

एमपीमधील लाजिरवाणी गोष्ट:भोपाळमधील शासकीय रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू

भोपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटीजन रिपोर्ट निगेटिव्ह होती, तरी मृत्यू झाला

मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे दोन कोराना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे आरोप आहेत की, रात्री ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. मरण पावलेले रुग्ण रामरती अहिरवार हे आयसीयूमध्ये भरती होते. तर दुसरा रुग्ण मेश्राम हे कोरोना संशयित वार्डात दाखल होते. आरोपाचे खंडन करताना जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, दोन्ही रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे झाला नसून आधीच त्याची प्रकृती गंभीर होती.

आतापर्यंत संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेलेले नाहीत. यापूर्वी 11 डिसेंबर 2020 रोजी हमीदियाच्या कोरोना वार्डात दोन तासांसाठी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. दरम्यान त्यामध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, तपासणी अवहालात क्लिन चीट देण्यात आली होती.

अँटीजन रिपोर्ट निगेटिव्ह होती, तरी मृत्यू झाला
मृत व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांनी न्यूमोनिया असल्यामुळे दोन दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात भर्ती केले होते. दरम्यान, त्याची अँटीजन टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु, रिपोर्ट येईपर्यंत त्यांना कोरोना संशयित वार्डात दाखल केले होते. मात्र, गुरुवारी रात्री तीन वाजता सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...