आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:घरावर कोसळले मिग-21, तीन महिलांचा मृत्यू, तिघे जखमी... दोन्ही पायलट सुरक्षित

दिव्य मराठी नेटवर्क | हनुमानगड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील हनुमानगडमधील एका घरावर सोमवारी सकाळी वायुदलाचे मिग-२१ लढाऊ विमान कोसळले. यात तीन महिलांचा मृत्यू झाला, तर इतर तीन जण जखमी आहेत. पायलट व को-पायलट सुरक्षित आहेत. याच्या कचाट्यात सापडलेल्या तिन्ही महिला चारा आणण्यासाठी एकाच वेळी घरातून निघाल्या होत्या. या घटनेमुळे घर जवळपास गायब झाले आहे. तेथे खोल खड्डा तयार झाला. स्फोट इतका तीव्र होता की विमानाचे तुकडे आसपासच्या चार घरांवर पडले. याच्या काही वेळातच सुरतगड एअरबेसहून एक हेलिकॉप्टर आले आणि पॅराशूटद्वारे उतरलेल्या जखमी वैमानिकांना रुग्णालयात हलवले.

मिग २१ सिंगल इंजिन विमान, समस्या निर्माण होताच कोसळते, पायलटकडे विमानाबाहेर पडण्याशिवाय कोणताच पर्याय नाही
डी. डी. वैष्णव, जोधपूर | गेल्या अनेक दशकांपासून हवाई संरक्षण करणारे रशियन लढाऊन विमान मिग-२१ देशातील पहिले सुपरसॉनिक आहे. सिंगल इंजिन असलेले हे विमान लहान मोहिमेसाठी सर्वोत्तम आहे. मात्र, वृद्ध झालेल्या या विमानाचे नियंत्रण थोडेसेही हटले तर ते दगडाप्रमाणे जमिनीवर कोसळते.

धोकादायक आहे तर का उडवत आहेत?
एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) गुरचरणसिंह भोगन सांगतात, जोपर्यंत नवी विमाने येत नाहीत तोपर्यंत ही विमाने टप्प्याटप्प्याने बंद करता येणार नाहीत.

संसदेत दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षांत ४५० पेक्षा अधिक मिग अपघातग्रस्त झाले आहेत. २०० पेक्षा जास्त पायलट्सनी प्राण गमावले. ७० नागरिक ठार झाले. या घटनांमध्ये २.७६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

इंजिनला आग लागल्यास काय होते?
जोधपूरसह अनेक एअरबेसमध्ये ३ हजार तासांहून अधिक मिग श्रेणीतील अनेक विमाने उडवणारे एअर मार्शल (निवृत्त) जसविंदर चौहान म्हणतात, सिंगल इंजिन विमान असल्याने ग्लायडिंग शक्य होत नाही. मीदेखील एकदा काही सेकंदातच उडी मारली आणि विमान शेतात कोसळून आगीचा गोळा बनले. हा निर्णय घेण्यासाठी मला काही सेकंद वेळ मिळाला होता.
जखमी पायलट