आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MiG 21 Crashes In Matasar Bhuratia Village Of Barmer, Pilot Safe, Fire Broke Out In Dhani

विमान दुर्घटना:भारतीय वायु सेनेचे मिग-21 विमान राजस्थानातील बाडमेर भागात कोसळले, दुर्घटनेनंतर विमानाने पेट घेतला, वेळीच विमानातून बाहेर पडल्याने पायलट बचावला

बाडमेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान राजस्थानच्या बाडमेर भागात कोसळले आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजता भुरटिया गावात झाला. लढाऊ विमानाने उड्डाण केल्यानंतर, तांत्रिक बिघाड झाला आणि विमान एका झोपडीवर कोसळले, ज्यामुळे आग लागली. मात्र वेळीच पायलट विमानातून बाहेर पडल्याने तो सुदैवाने सुखरुप आहे. विमान दुर्घटनेबाबत हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुर्घटनाग्रस्त मिग -21 लढाऊ विमानाचा पायलट अपघातस्थळापासून एक किलोमीटर दूर नवजी का पान गावाजवळ सापडला. स्थानिक लोकांनी त्याची काळजी घेतली आणि प्रशासनाला कळवले. यानंतर पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळ सील केले आहे. एअरफोर्स टीमही घटनास्थळी रवाना झाली आहे.

मिग -21 बायसन सुरतगडमध्ये कोसळले होते
यापूर्वी 17 मार्च रोजी एका अपघातात मिग -21 बायसन हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले होते. या अपघातात हवाई दलाच्या कॅप्टनला आपला जीव गमवावा लागला. जानेवारीमध्ये मिग -21 बायसन राजस्थानच्या सुरतगडमध्ये कोसळले. त्यावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला होता.

5 वर्षात 483 पेक्षा जास्त मिग -21 क्रॅश झाले
एकेकाळी मिग -21 ला भारतीय हवाई दलाचा कणा म्हटले जात असे, पण आता ही विमाने अप्रचलित झाली आहेत. अपग्रेड असूनही, ते ना युद्धासाठी योग्य आहेत ना उड्डाणासाठी. गेल्या 5 वर्षात 483 हून अधिक मिग -21 विमाने अपघातांना बळी पडली आहेत. या अपघातात 170 हून अधिक वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...