आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MiG 21 Fighter Jet Crash In Hanumangarh UPdate | Rajasthan News, Air Force Aircraft

लढाऊ विमान कोसळले:राजस्थानच्या हनुमानगडमध्ये हवाई दलाचे मिग-21 घरावर पडले; 3 महिलांचा मृत्यू, पायलट सुरक्षित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमधील हनुमानगड परिसरात सोमवारी सकाळी भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-21 कोसळले. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. वैमानिक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते.

अपघात स्थळावरील पाहा फोटो...

वैमानिकाला ग्रामस्थांनी उचलून नेले.
वैमानिकाला ग्रामस्थांनी उचलून नेले.

मृतांची नावे...

बाशोकौर रतन सिंग शीख (45), बंटो पलालसिंग राय सिंग (60), लीला देवी राम प्रताप (55) या तीन महिलांचा मृत्यू झाला. पायलट राहुल अरोरा (25) यांनी पॅराशूटने उडी मारून जीव वाचवला. पायलटला त्वरीत सुरतगडला पाठवण्यात आले आहे.

ज्या घरावर मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले त्या घराचा हा फोटो आहे.
ज्या घरावर मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले त्या घराचा हा फोटो आहे.
घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. घराचा ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीही आणली गेली आहे.
घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. घराचा ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीही आणली गेली आहे.
घरावर विमान कोसळल्यानंतर विमानाची झालेली तोडफोड, तसेच घराचे झालेले नुकसान.
घरावर विमान कोसळल्यानंतर विमानाची झालेली तोडफोड, तसेच घराचे झालेले नुकसान.
अपघातानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती.
अपघातानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती.
घराची झालेली दुरावस्ता. त्याचबरोबर पोलिसांनी संपूर्ण परिसराला गराडा घातला होता.
घराची झालेली दुरावस्ता. त्याचबरोबर पोलिसांनी संपूर्ण परिसराला गराडा घातला होता.
लोकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळावर गर्दी केली होती.
लोकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळावर गर्दी केली होती.
हनुमानगढचा परिसर जिथे हा अपघात झाला. विमानाला आग लागल्यानंतर धुराचे लोट दिसत आहेत.
हनुमानगढचा परिसर जिथे हा अपघात झाला. विमानाला आग लागल्यानंतर धुराचे लोट दिसत आहेत.

16 महिन्यांत MIG-21 सात वेळा क्रॅश

  • 5 जानेवारी 2021: सुरतगड, राजस्थान येथे अपघात झाला. या अपघातात पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
  • 17 मार्च 2021: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ मिग-21 बायसन विमान कोसळले. या घटनेत आयएएफ ग्रुप कॅप्टनचा मृत्यू झाला.
  • 20 मे 2021 : MiG-21 चा दुसरा अपघात पंजाबमधील मोगा येथे झाला. या अपघातात पायलटला आपला जीव गमवावा लागला होता.
  • 25 ऑगस्ट 2021 : राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग-21 पुन्हा एकदा अपघाताचे बळी ठरले. या विमान अपघातात पायलटला स्वतःला वाचवण्यात यश आले.
  • 25 डिसेंबर 2021 : राजस्थानमध्येच मिग-21 मध्ये बायसन क्रॅश झाला. या अपघातात पायलटला आपला जीव गमवावा लागला होता.
  • 28 जुलै 2022 : मिग-21 विमान राजस्थानच्या बारमेरमध्ये कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला.
  • 8 मे 2023: मिग-21 विमान राजस्थानच्या बारमेरमध्ये कोसळले. पायलट सुरक्षित.

गेल्यावर्षी बाडमेरमध्ये मिग-21 बायसन कोसळले, 2 पायलट शहीद

28 जुलै 2022 रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे मिग-21 बायसन (प्रशिक्षक विमान) क्रॅश झाले होते. त्यात आग लागली आणि सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिघात विमानाचे पार्ट विखुरले गेले होते. या अपघातात विमानातील दोन्ही पायलट शहीद झाले. विमान जेथे पडले तेथे 15 फूट खोल एक मोठ्ठे खडले पडले होते.

हे दोन्ही पायलट जुलै 2022 मध्ये बारमेर मिग अपघातात शहीद झाले होते.
हे दोन्ही पायलट जुलै 2022 मध्ये बारमेर मिग अपघातात शहीद झाले होते.

5 दशकात 400 अपघात, 200 वैमानिकांना गेला जीव
सोव्हिएत युनियनने 1940 मध्ये मिग विमान बनवले आणि 1959 मध्ये हवाई दलात समाविष्ट केले. मग ते 2,229 किलोमीटर प्रतितास वेगाने म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा 1000 किमी/तास जास्त वेगाने उडू शकते. एप्रिल 1963 मध्ये मिगचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला.

1971 आणि 1999 चे युद्ध जिंकण्यात मिगचा महत्त्वाचा वाटा होता. पण भारतात गेल्या पाच दशकात 400 अपघातांमध्ये 200 वैमानिकांनाही जीव गमवावा लागला आहे. 2025 पर्यंत मिग-21 विमाने भारताच्या आकाशातून उतरवली जातील.

मिग-21 चे सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे....

21 मार्च 2002 रोजी संसदेतील लोकलेखा समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हवाई दलातील एकूण अपघातांपैकी 62% अपघात हे मिग विमानांचे झाले आहेत. विविध अहवाल आणि तज्ज्ञांनी या अपघातातील 3 प्रमुख कारणे सांगितली आहेत..

  • मानवी कारण प्रगत जेट ट्रेनर विमानांच्या अनुपस्थितीत हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी मिगचा वापर केला जातो. प्रशिक्षणार्थी वैमानिक विमान उडवल्यामुळे मानवी चुकांची शक्यता जास्त असते. माजी एअर मार्शल अनिल चोप्रा म्हणतात की, आता MiG नव्हे तर हॉक फायटर ट्रेनर ट्रेनिंगमध्ये वापरला जातो.
  • तांत्रिक कारण पार्ट्स आणि मशिनरी हे देखील अपघाताचे एक कारण आहे. या अपघातांसाठी रशियन कंपनीने भारतीय हवाई दलाच्या निकृष्ट देखभालीला जबाबदार धरले आहे. जरी माजी एअर मार्शल अनिल चोप्रा म्हणतात की, MIG-21 विमाने उडवली जात आहेत 100% सेवायोग्य आहेत.
  • पक्षी धडक ऑगस्ट 2019 मध्ये, भारतीय वायुसेनेने सांगितले की एप्रिल 2011 ते मार्च 2014 या कालावधीत IAF विमानांच्या एकूण अपघातांपैकी सुमारे 10% अपघात पक्ष्यांचे होते. काही तज्ञ त्याच्या डिझाइनला सदोष देखील म्हणतात. त्यांच्या मते, कॉकपिटच्या खिडक्यांची रचना अशी आहे की पायलटला धावपट्टी नीट पाहता येत नाही. त्यामुळे लँडिंग करताना मिग-21 क्रॅश होण्याची भीतीही आहे.

हे ही वाचा

दिव्य मराठी एक्सप्लेनर 13 सेकंदात 2 विमानांची टक्कर : सर्वात मोठा विमान अपघात; मिस कम्युनिकेशनने 586 मृत्यू

27 मार्च 1977 ची घटना आहे. जगातील सर्वात मोठा विमान अपघात स्पेनमधील लॉस रेडिओज विमानतळावर घडला. दोन विमानाची भीषण टक्कर झाली, त्यात 586 जणांना जीव गमवावा लागला. या अपघाताला आज 46 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या विमान अपघाताची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी

भारत-पाक युद्धात 'MiG-21' विमानांने गाजवली मर्दुमकी, दिला सर्वोत्कृष्ट हवाई शक्तीचा प्रत्यय

भारतीय हवाई दलाने हे विमान १९६१ साली खरेदी करण्याचे ठरवले. कारण तेव्हा रशियाने जुळणीसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. या विमानाच्या रुपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे पदार्पण झाले. परंतु १९६५च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे याचा परिपूर्ण वापर झाला नाही. मात्र हे विमान काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. ​​​​​​- येथे वाचा संपूर्ण बातमी