आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाडमेरच्या उत्तरलाईमधून उड्डाण केलेले मिग-२१ बायसन कोसळल्यामुळे दोन तरूण वैमानिक शहिद झाल्यानंतर या लढाऊ विमानांना सेवेतून निवृत्त करण्याची चर्चा पुन्हा सुरू आहे. दुसरीकडे या श्रेणीतील स्क्वाड्रन व िवमानांची कमतरता भासत असल्याने पाकिस्तानला लागून असलेली पश्चिमेकडील हवाई तटबंदी उद्ध्वस्त होत चालल्याचेही वास्तव आहे. त्याची जागा लाइट कॉम्बेट एअरक्राफ्ट (एलसीएल) तेजस मार्क-१ ए घेणार आहे. परंतु त्यासाठी सात ते आठ वर्षांचा कालावधी लागू शकतो. हवाई दलासाठी ४८ हजार कोटी रुपये खर्चून एचएएलकडून तेजस मार्क-१ ए खरेदीची ऑर्डर गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. परंतु त्याच्या निर्मितीमध्ये विलंब होणार आहे. मिग श्रेणीच्या चार स्क्वाड्रन राहिल्या आहेत. त्यापैकी ३५ ते ४० विमाने आता शस्त्रागारात राहिली आहेत. ही विमाने देखील २०२४ पर्यंत निवृत्त करण्याची योजना आहे. हवाई दलाकडे आता ४२ ऐवजी २० स्क्वाड्रनही राहिलेली नाहीत. त्यामुळेच ५९ वर्षांपूर्वीच्या मिग-२१ लढाऊ विमानांशिवाय तूर्त तरी काही पर्याय शिल्लक नाही. पश्चिमेकडील बहुतांश छावण्या रिकाम्या आहेत. सर्वात शक्तीशाली हवाई तळ जोधपूरमधून मिग श्रेणीतील तीन स्क्वाड्रन गेल्या चार वर्षांत फेज आऊट झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.