आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Migrant Workers News | Uttar Pradesh Migrant Workers Killed In Truck Road Accident Today In Chhatarpur Sagar Border Near Bakswaha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजुरांचे ट्रक उलटले:महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांच्या ट्रकला छतरपूर येथे भीषण अपघात; 5 मजूरांसह 6 जणांचा मृत्यू

मुंबई / छतरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशच्या घटनेनंतर मध्य प्रदेशात दोन अपघातांचे वृत्त समोर आले आहे

उत्तर प्रदेशात मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झालेला असताना मध्य प्रदेशात सुद्धा मजुरांचे ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी हे ट्रक उलटले. या अपघातात 5 मजुर आणिु एका तरुणीस 6 जणांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात 20 मजूर जखमी झाले आहेत. हा ट्रक पाइपने भरले होते. त्यावरच बसून हे मजूर प्रवास करत होते. सगळेच मजूर महाराष्ट्रातून आपल्या उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी निघाले होते. सर्वांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 17 वर्षीय तरुणीचे नाव गुडिया असे होते. तर मारले गेलेल्या मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. ते उत्तर प्रदेशातील विविध गावातील रहिवासी होते असे सांगितले जात आहे.

छतरपूरमध्ये आणखी एका अपघातात 13 मजूर जखमी झाले आहेत. शाहगड हायवेवर पठाण वाल्या घाटीजवळ एक पिक-अप ट्रक उलटले आहे. जखमी झालेले सर्व मजूर उत्तर प्रदेशचेच आहेत. या पिक-अप ट्रकमध्ये एकूण 20 मजूर उत्तर प्रदेशच्या दिशेने जात होते. जखमींमध्ये एका महिला आणि लहान मुलीचा सुद्धा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना छतरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...