स्थलांतर : दहा किलाे चांदीपासून बनवलेल्या सिंहासनावर हाेणार रामलल्ला विराजमान 

  • रामलल्ला 27 वर्षांनी तंबूतून आता तात्पुरत्या मंदिरात

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 24,2020 09:28:00 AM IST

अयोध्या - श्री रामलल्ला २७ वर्षांनी तंबूतून बाहेर पडून २५ मार्च राेजी तात्पुरत्या मंदिरामध्ये १० िकलाेेच्या चांदीपासून बनलेल्या सिंहासनावर विराजमान हाेतील. रामलल्लांना वातानुकूलित तात्पुरत्या मंदिरात नेण्याची वैदिक प्रक्रिया साेमवारी सकाळी सुरू झाली आहे. त्याचबराेबर राम जन्मभूमीवर मंदिर उभारण्याची सुरुवातही झाली आहे. तात्पुरते मंदिर आणि तंबू यांच्या जागी पुजाऱ्यांचे दल पूजा करत आहे. ही प्रक्रिया गुढीपाडवा म्हणजे रामलल्लासाठीच्या नव्या मंदिरात विराजमान हाेईपर्यंत कायम सुरू राहील.


रामलल्लांसाठी १० किलाे चांदीपासून जयपूर येथे बनलेले सिंहासन पाेहचले आहे. सिंहासन अयाेध्याचे माजी राज घराण्याचे उत्तराधिकारी विमलेंद्र माेहन मिश्र यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे साेमवारी सुपूर्द केले. ट्रस्टच्या वतीने महासचिव चंपत राय यांनी सिंहासनाचा स्वीकार केला. सिंहासन राज घराण्याने तयार केले आहे. रामलला हे सध्या लाकडाने बनलेल्या सिंहासनावर १९९२ पासून विराजमान आहेत.

हे धार्मिक अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी पुजारी तयारीत आहेत. यामध्ये भाविक सहभागी हाेणार नाहीत. रामल्लांसाठी जर्मनीतील पाइन लाकूड आणि काचेपासून तात्पुरते मंदिर तयार झाले आहे. यावर मथुरेत तयार झाले कथिलपासून तयार करण्यात आलेला कलश ठेवला जाईल. याच्या तिन्ही बाजुला दुहेरी बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे. हे मंदिर सर्व प्रकारच्या हवामानासाठी अनुकूल असे आहे.


पूजा प्रक्रियेत देशातील १६ पुजारी सहभागी

पूजा ४८ तास सुरू राहील. नवीन तात्पुरत्या मंदीराची शुद्धी आणि स्थापनेशी निगडीत वैदिक मंत्र परिसरात गुंजत आहेत. २५ मार्चला पहाटे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ नवीन अस्थायी मंदिरामध्ये रामललाला अभिषेक करतील. पूजा प्रक्रियेसाठी देशाच्या वेगवेगळ‌्या भागातून १६ आचार्य आले आहेत. सर्व आचार्य वैदिक विद्वान आहेत. ते दक्षिण भारत आणि काशीसह अनेक स्थानांवरून आले आहेत.

X