आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी नेटवर्क:अतिरेक्यांचा गोळीबार; दोन मजूर जखमी

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी शनिवारी रात्री बाहेरून आलेल्या दोन मजुरांवर गोळीबार केला. रख-मोमीन भागात ही घटना घडली. दोघा मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. यापैकी एक मजूर बिहार आणि दुसरा नेपाळचा आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. अनंतनाग जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांवर हल्ला होण्याची ही १० दिवसांतील दुसरी घटना आहे. याआधी अतिरेक्यांनी १८ ऑक्टोबरला शोपियां जिल्ह्यात उत्तर प्रदेशच्या २ मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. या वर्षी आतापर्यंत २१ टार्गेट किलिंग झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...