आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचाराचे लोण:बांदीपोऱ्यात अतिरेक्यांनी केली बिहारी मजुराची हत्या; परप्रांतीय कामगारांत दहशतीचे वातावरण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी पहाटे आणखी एका बिहारी मजुराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहम्मद अमरेज (19) नामक हा मजूर बिहारच्या माधेपुरा जिल्ह्याचा रहिवासी आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसराच सर्च ऑपरेशन चालवले आहे.

काश्मीर पोलिसांनी एका निवेदनाद्वारे सांगितले की, अतिरेक्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील सदुनारा गावात मजुरावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमरेज येथे मजुरी करत होता.

भाऊ म्हणाला -झोपेत असताना झाला गोळीबार

अमरेजच्या भावाने माध्यमांना सांगितले की, आम्ही दोघे भाऊ झोपेत होतो. तेव्हा भावाने ला उठवून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळानंतर माझा भाऊ तिथे झोपलेला दिसला नाही. मी त्याला शोधण्यासाठी गेलो असतो तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मी लष्कराला फोन केला. त्यांनी त्याला इस्पितळात हलवले. पण रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

अमरेज आपल्या भावासोबत बांदीपोऱ्यात रोजंदारीवर काम करत होता. या भागात बिहारचे अनेक मजूर काम करतात.
अमरेज आपल्या भावासोबत बांदीपोऱ्यात रोजंदारीवर काम करत होता. या भागात बिहारचे अनेक मजूर काम करतात.

5 वर्षांत 28 अनिवासींची हत्या

केंद्राने काही दिवसांपूर्वीच संसदेत जम्मू काश्मिरात 2017 पासून 5 जुलै 2022 पर्यंत 28 अनिवासी मजुरांची हत्या करण्यात आल्याची माहिती दिली होती.यात सर्वाधिक 7 मजूर बिहारचे आहेत. याशिवाय, महाराष्ट्राचे 2 व झारखंडच्या एका मजुराचीही हत्या झाली आहे.

खोऱ्यात सातत्याने का होत आहेत बिगर-काश्मिरींची हत्या?

गुप्तहेर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तान खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी टार्गेटेड किलिंगची मदत घेत आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मिरातील काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांवर पाणी फेरण्यासाठी या हत्या केल्या जात आहेत.

काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या टार्गेटेड किलिंगविरोधात जून महिन्यात काश्मिरी पंडितांनी सरकारविरोधात निदर्शने केली होती. हे त्यावेळचे छायाचित्र आहे.
काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या टार्गेटेड किलिंगविरोधात जून महिन्यात काश्मिरी पंडितांनी सरकारविरोधात निदर्शने केली होती. हे त्यावेळचे छायाचित्र आहे.

कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील टार्गेटेड किलिंगच्या घटनांत वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने अतिरेक्यांनी काश्मिरी पंडित व परप्रांतीय कामगारांसह भारताप्रती मवाळ धोरण असणाऱ्या स्थानिक मुस्लिम प्रशासकीय व पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले आहे.

अपप्रचार करून खोऱ्यात सक्रिय राहण्याचे कारस्थान

कलम 370 रद्द केल्यानंतर बाहेरून येणारे स्थलांतरित कामगार त्यांच्या नोकऱ्या व जमिनी बळकावतील, असा अपप्रचार आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेकडून केला जात आहे. या प्रचाराद्वारे ही संघटना पाकिस्तानी अतिरेकी संघटनांसाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...