आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवंशाला झालेल्या लम्पी आजाराचा परिणाम आता दुधाच्या वाढत्या दरातून समोर आला आहे. दहा महिन्यांत दुधाचे दर ८ रुपये (१३.५८ टक्के) प्रतिलिटरने वाढले. मार्च २०२२ मध्ये ५८ रुपये प्रतिलिटर होते. आता ६६ रुपये लिटर झाले आहे. दूध संघांनुसार दरवाढीमागे मागणीत वाढ आणि पुरवठा घटणे हे कारण ठरले आहे. देशातील सर्वात मोठे गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) दररोज ३ कोटी लिटर दूध खरेदी करते. यापैकी १.४ कोटी लिटरची विक्री करते. उर्वरित १.६ कोटी लिटर दही आणि इतर उत्पादने बनवले जातात. गेल्या वर्षी १ कोटी लिटर दूर विक्री झाले होते. म्हणजे डिमांड ६० टक्क्यांनी वाढली.
हीच स्थिती मध्य प्रदेशातील आहे. मप्र दूध संघ सहा डेअरींच्या माध्यमातून रोज २० लाख लिटर दूध खरेदी करते. आधी १५.२० लाख लिटर खरेदी केली जात होती. गुजरात फेडरेशनचे चेअरमन आर.एस. सोढी म्हणाले, मागणी लक्षात घेता आगामी दिवसांत दूधाचे भाव आणखी वाढू शकतात. कारण लम्पीमुळे पशुपालकांनी पशू कमी केेले होते. देशात ३० कोटी दुभती जनावरे आहेत. त्यापैकी १ लाख पाळीव प्राण्यांवर लम्पीचा परिणाम जाणवला आहे.
चारा ३७% महागला, विदेशातून मागणी वाढ {पशुखाद्याचे दर २०२१ मध्ये १६-१७ रु. िकलो होते. ते आता २२-२३ रु. किलो आहेत. म्हणजे एका वर्षातच ३७% पर्यंत वाढ. {2021-22 में 33,017 टन मिल्क फॅट निर्यात झाले, जे 20-21 मध्ये 15,600 टन होते. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान 13,360 मेट्रिक टन मिल्क फॅट निर्यात झाले आहे. {मिल्क फॅटचे आंतरराष्ट्रीय दर 1 सप्टेंबर 2022 ला 2,663 डॉलर प्रतिटन होते. ते जानेवारी 2023 मध्ये 2,842 डॉलर प्रतिटन आहेत. दुधाचे दर देशातच नव्हे तर जगभरात वेगाने वाढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.