आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Milkha Singh Didn't Know That His Wife Was Not In The World, His Daughter Whispered In His Ear At The Last Moment Baba .. You Are Going To Mother

'फ्लाइंग सिख':पत्नी जगात नाही हे मिल्खांना माहीतच नव्हते, शेवटच्या क्षणी मुलीने कानात सांगितले - बाबा.. तुम्ही आईकडे जात आहात

मनोज अपरेजा | चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नीच्या निधनाची वार्ता मिल्खांपासून दडवली होती, घरी परतल्यावर सांगणार होते

आपली अर्धांगिनी निर्मल कौर या आता या जगात नाहीत, हे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांना माहीतच नव्हते. सहा दशके मिल्खांची सावली बनून चालणाऱ्या निर्मल कौर १३ जून रोजीच कोरोनाविरुद्धच्या लढाईत पराभूत झाल्या होत्या. मिल्खांची तब्येत सुधारत होती. ते अशक्त झाले होते. त्यामुळे त्यांना धक्का बसेल म्हणून निर्मल कौर यांच्या निधनाचे वृत्त त्यांना सांगितले नाही. बरे होऊन घरी आल्यावर त्यांना सांगू, असा कुटुंबीयांचा बेत होता. मात्र, काळाने वेगळेच ठरवले होते. निर्मल गेल्यानंतर पाच दिवसांनी १८ जून रोजी रात्री मिल्खाही दुसऱ्या जगात निघून गेले.

आपल्या वडिलांचा शेवटचा क्षण आल्याची जाणीव मिल्खा यांचे चिरंजीव जीव मिल्खा यांना झाली होती. कोरोनामुळे फुप्फुसे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते. रक्तदाब झपाट्याने कमी होऊ लागला तेव्हा मुलगा जीव आणि मुलगी मोना यांनी मिल्खा यांच्या कानात सांगितले की, ‘बाबा.. तुम्ही आता आई जेथे गेली तेथेच जात आहात.’ मिल्खा त्या वेळी ‘नाॅन इन्व्हेसिव्ह’ व्हेंटिलेटरवर होते. हे ऐकून मिल्खा सिंग यांनी डोळे उघडून प्रतिसाद दिला आणि पुन्हा आपले डोळे मिटले. जीव सिंग म्हणाले की, ‘आई गेल्याची वार्ता त्यांना सांगावी, असे आम्हाला वाटत नव्हते. तथापि, त्यांची इच्छाशक्ती खूपच मजबूत होती. ते कोरोनातूनही बाहेर आले होते. मात्र ईश्वराला काही वेगळेच मान्य होते. मग आम्ही विचार केला की, त्यांच्या अखेरच्या श्वासापूर्वी तरी त्यांना सर्व काही खरे सांगावे.’

मिल्खा सिंग १७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ३१ मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. मात्र ३ जून रोजी त्यांना पुन्हा रुग्णालयात भरती करावे लागले. प्रकृती बिघडत गेली. याच दरम्यान १२ जून रोजी निर्मल कौर यांचे निधन झाले. मात्र, मिल्खा सिंग यांना त्यांच्या निधनाची वार्ता १७ जून रोजी सांगितली गेली, तीही त्यांच्या अंतिम श्वासांच्या वेळी...

अखेरच्या प्रवासातही पत्नीची साथ!
मिल्खांवर शनिवारी रात्री चंदीगडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत पत्नी निर्मल कौर यांचा फोटो त्यांच्या हातात ठेवला गेला. निर्मलही खेळाडू होत्या. त्या भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार राहिल्या होत्या. कोरोनापूर्वी दोघेही तंदुरुस्त होते. ९१ वर्षांचे मिल्खा रोज जॉगिंग करत. दुखत असले तरी कधी ते साधी पेनकिलरही घेत नव्हते.

बातम्या आणखी आहेत...