आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Milkha Singh Passes Away; Flying Sikh Milkha Singh Best Memories In Photos | Milkha Singh Pictures; News And Live Updates

10 फोटोमध्ये मिल्खा सिंग यांच्या आठवणी:पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी दिला होता 'फ्लाइंग सिख' चा खिताब; अब्दुल खालिकचा पराभव पाहून स्टेडिअमचे दर्शक झाले होते अवाक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकण्याचा विक्रम 56 वर्षानंतर मोडला

माजी भारतीय दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या पाच दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी निर्मल कौर यांचे निधन झाले होते. मिल्खा सिंग यांच्यावर चंदीगडमधील पीजीआयएमईआर येथे 15 दिवसापासून उपचार सुरू होते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे 3 जून रोजी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तत्पूर्वी 19 जून रोजी मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी गोविंदपुरा (आता पाकिस्तानचा भाग) येथील शीख कुटुंबात झाला होता. त्यांना खेळ आणि देशाबद्दल खूप प्रेम होते. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर ते भारतात आले आणि भारतीय सैन्यात दाखल झाले.

मिल्खा सिंग यांनी नाकारला होता अर्जुन पुरस्कार

महान धावपटू मिल्खा सिंग यांना 1959 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 2001 मध्ये त्यांना अर्जून पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, त्यांनी तो नाकारला होता. आजकाल मंदिरात प्रसाद सारखे पुरस्कारांचे वितरण केले जात असल्याचे ते म्हणाले होते.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकण्याचा विक्रम 56 वर्षानंतर मोडला

मिल्खा सिंग यांनी 1958 कॉमनवेल्थ गेम्समधील ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. 56 वर्षांपासून कोणीही हा विक्रम मोडू शकल नव्हता. 2010 मध्ये कृष्णा पूनिया यांनी 2010 च्या डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

एशियन गेम्समध्ये सलग दोन सुवर्ण जिंकले

1962 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत मिल्खा यांनी सलग दोन सुवर्णपदके जिंकली. मिल्खा यांनी 400 मीटर आणि 400 मीटर रिले रेसमध्ये त्याने सुवर्ण जिंकले होते. यापूर्वी 1958 च्या एशियन गेम्समध्ये त्याने 200 मीटर आणि 400 मीटरमध्ये सुवर्ण पदके जिंकली होती.

मरण्यापूर्वी कोणीतरी ऑलिम्पिक पदक जिंकावे

मिल्खा सिंग यांना 4 मार्च 2018 रोजी पंजाब विद्यापीठाच्या 67 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात खेल रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी भारताचे उपराष्ट्रपती आणि पंजाब विद्यापीठाचे कुलपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मिल्खा सिंग म्हणाले की, मी मरण्यापूर्वी कुणीतरी ऑलिम्पिक पदक जिंकावे.

40 वर्षानंतर मिल्खा सिंग यांचा 400 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला

मिल्खा सिंग यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमधील 400 मीटर शर्यतीत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. तथापि, त्याने ते पदक जिंकले नव्हते, परंतु, 45.43 सेकंदाचा तो अवधी 40 वर्षांपर्यंत राष्ट्रीय विक्रम बनला होता.

3 जून रोजी पुन्हा प्रकृती बिघडल्यावर त्यांना पीजीआयमध्ये दाखल

मिल्खा सिंग यांच्या मृत्यूच्या 24 मिनिटांपूर्वीचा हा फोटो आहे. शुक्रवारी रात्री उशीरा 11 वाजता पीजीआय चंदीगड येथे त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल 19 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता.

पाकिस्तानचे अध्यक्ष अय्यूब खान यांनी दिले होते फ्लाइंग शीख नाव

पाच वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे मिल्खा सिंग यांना पहिल्यांदा 1960 मध्ये फ्लाइंग शीख नाव देण्यात आले होते. ते पाकिस्तानचे अध्यक्ष अय्यूब खान यांनी दिले होते.

फाळणीच्या वेळी झाले अनाथ

मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी गोविंदपुरा (सध्या पाकिस्तानचा भाग) येथील शीख कुटुंबात झाला होता. क्रीडा आणि देशाबद्दल खूप प्रेम होतं. त्यामुळे फाळणीनंतर ते भारतात आले आणि भारतीय सैन्यात दाखल झाले.

तिसर्‍या प्रयत्नात मिल्खा सैन्यात निवड

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेटीचे चित्र. यात तो सैन्याच्या गणवेशात आहे. तिसर्‍या प्रयत्नात मिल्खा सिंग हे सैन्यात निवडून आले.

बातम्या आणखी आहेत...