आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Minister Nitin Gadkari's Warning To Companies|Revise DPR Of Roads, Or Face Destruction

मंत्री नितीन गडकरींचा कंपन्यांना इशारा:रस्त्यांच्या डीपीआरमध्ये सुधारणा करा, अन्यथा सत्यानाश होईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते, महामार्गाचे प्रकल्प अहवाल (डीपीआर) सदोष असतात त्यामुळे काही अपघात होतात. त्यांचे डीपीआर बनवण्यासाठी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सुरुवातच तिथून झाली पाहिजे. त्यात आधी सुधारणा झाली नाही तर तुमचा सत्यानाश होईल, अशा कडक शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इशारा दिला आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रविवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला.

त्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात ते बोलत होते. काही कंपन्यांचे डीपीआर अत्यंत सदोष असतात. ते बऱ्याच वेळा रस्ते अपघातासाठी कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर रस्ते, महामार्गांच्या कामांना विलंब झाल्यास त्याचा खर्चही वाढतो. या विलंबामागची कारणे शोधली पाहिजेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, सायरस मिस्त्री (54) आणि त्यांच्यासोबत कार अपघातात मृत्युमुखी पडलेले जहांगीर पंडोले यांच्या मृतदेहांची जे.जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मिस्त्री यांच्यावर मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अपघातात जखमी झालेल्या व कारच्या चालक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ अनहिता पंडोले आणि डेरियस पंडोले यांना सोमवारी मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

20 किमी अंतर केवळ 9 मिनिटांत कापले : मर्सिडीज कारचा प्रचंड वेग आणि सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत मागे बसलेल्या पंडोले यांनी सीट बेल्ट लावले नव्हते, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर कारचा वेग एवढा प्रचंड होता की केवळ 9 मिनिटांत या कारने 20 किलोमीटर अंतर कापले होते. वेग प्रचंड आणि चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी दुभाजकावर धडकली, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...