आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेख हसीनांचा जयपूरमध्ये डान्स:30 मंत्र्यांसह अजमेर दर्ग्याला आल्या होत्या बांगलादेशी PM;स्थानिक कलाकारांसोबत धरला ठेका

अजमेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळासह अजमेर स्थित ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट दिली. त्या दिल्लीहून जयपूर विमानतळावर सकाळी 11 वा. पोहोचल्या. राजस्थानच्या स्थानिक कलाकारांनी यावेळी स्थानिक लोकनृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले. यावेळी हसीनांनाही स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी त्यांच्यासोबत ठेका ठरला.

शेख हसीना यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेखातर संपूर्ण दर्गा रिकामा करण्यात आला. त्यांच्या मार्गावरील वाहतूकही अन्यत्र वळवण्यात आली होती. बांग्लादेशी पंतप्रधानांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील 30 हून अधिक मंत्री व नातेवाईकही भारताच्या दौऱ्यावर आलेत.

शेख हसीना यांनी दर्गाह समितीच्या व्हिजिटर बूकमध्ये बांगलादेशी भाषेत आपला संदेश लिहिला. त्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाचीही दस्तरबंदी करण्यात आली. जवळपास 1 तास थांबल्यानंतर शेख हसीनांचा ताफा बजरंगगड स्थित सर्किट हाऊसमध्ये पोहोचला. तिथे काहीवेळ थांबल्यानंतर त्या जयपूरकडे रवाना झाल्या.

शेख हसीनांचे जयपूरच्या सांगानेर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करण्यात आले. तिथे त्यांनी नृत्यही केले.
शेख हसीनांचे जयपूरच्या सांगानेर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करण्यात आले. तिथे त्यांनी नृत्यही केले.

चोख सुरक्षा बंदोबस्त

शेख हसीना यांनी दर्ग्यावर भारत-बांगलादेशातील संबंध अधिक मजबूत होण्याची प्रार्थना केली. त्यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. अजमेरच्या फव्वारा सर्कलपासून दिल्ली गेट मार्गे दर्गाह बाजारापर्यंत सर्वच दुकाने व घरे सकाळी 11 च्या सुमारास बंद करण्यात आली होती. नागरिकांना कोणतीही इमारत, घर, बाल्कनी, दुकान, हॉटेल, गेस्ट हाऊसच्या बाल्कनीत थांबण्यास मनाई करण्यात आली होती. क्षेत्रात केवळ जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या पासधारकांनाच प्रवेश देण्यात येत होता.

पंतप्रधान शेख हसीना यांना सय्यद कलीमुद्दीन नायब सदर अंजुमन समितीने एक छायाचित्र भेट म्हणून दिले.
पंतप्रधान शेख हसीना यांना सय्यद कलीमुद्दीन नायब सदर अंजुमन समितीने एक छायाचित्र भेट म्हणून दिले.
सर्किट हाऊसमध्ये काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी दर्ग्याला भेट दिली. शेख हसीना यांच्यासोबत एक मोठे शिष्टमंडळही भारत दौऱ्यावर आले आहे.
सर्किट हाऊसमध्ये काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी दर्ग्याला भेट दिली. शेख हसीना यांच्यासोबत एक मोठे शिष्टमंडळही भारत दौऱ्यावर आले आहे.

हसीनांनी यापूर्वीही दिली अजमेरला भेट

उल्लेखनीय बाब म्हणजे शेख हसीना यांनी यापूर्वीही अनेकदा अजमेर स्थित ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याला भेट दिली आहे. पंतप्रधानपदी असताना त्यांनी 1996, 2010 व 2017 मध्ये त्या येथे आल्या होत्या. 1975 ते 1980 पर्यंत शेख हसीना दिल्लीतच राहत होत्या. त्या काळातही येथे येत होत्या. पंतप्रधान म्हणून त्या अजमेरला चौथ्यांदा आल्या.

बातम्या आणखी आहेत...