आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येत्या सणासुदीच्या काळात काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य मंत्रालयाने मंगळवारी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. कंटेनमेंट झोनमध्ये कोणतेही धार्मिक पठण, मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त, आयोजक, कर्मचारी आणि लोकांनाही कंटेनमेंट झोनमधून जाऊ दिले जाणार नाही. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना घरात राहून उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहित केले जाईल. कार्यक्रम केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरच आयोजित केले जातील असे मंत्रालयाने आपल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्राेसिजरमध्ये (एसओपी) म्हटले आहे.
आयोजक - प्रशासन या उपाययोजना करतील
देशात उत्सव, मेळावा, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि अन्य उत्सवी कार्यक्रमात माेठ्या संख्येने गर्दी हाेते. त्यासाठी प्रशासन स्तरावर या आवश्यक गाेष्टींचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
> कार्यक्रमाचे ठिकाण ओळखून तपशीलवार कृती आराखडा तयार करा, जेणेकरून थर्मल स्क्रीनिंग, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळता येतील.
> रॅली आणि विसर्जन मिरवणुकीच्या बाबतीत, लोकांची संख्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावी. तसेच शारीरिक अंतर आणि मास्कची देखील काळजी घेतली पाहिजे.
> थर्मल स्कॅनिंग, शारीरिक अंतर आणि मास्क घातलेले स्वयंसेवक तैनात करावेत. रंगभूमी आणि चित्रपट कलाकारांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे रंगमंच कलाकारांनाही लागू होतील.
> लांब पल्ल्याच्या रॅली आणि मिरवणुकीसाठी रुग्णवाहिका सेवांची गरज भासू शकते. प्रदर्शन, मेळावे, पूजा मंडप, रामलीला मंडप यासारख्या अनेक दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांसाठी कमाल लोकांची संख्या निश्चित करण्यासाठी पर्याप्त उपाययोजना कराव्यात. विभिन्न वेळा ठेवणे आणि प्रवेशबंदीवरही विचार केला जाऊ शकताे.
> सॅनिटायझर आणि थर्मल गनचा पुरेसा पुरवठा आणि अंतर राखण्यासाठी जमीन चिन्हांकित करावी. देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही इत्यादींचा वापर करावा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.