आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ministry Of Health PC On Coronavirus Case Fatality Rate Is Lowest Since The First Lockdown

कोरोनावर आरोग्य मंत्रालय:देशात 24 तासात 6.6 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या, पहिल्या लॉकडाउननंतर मृत्यूदर सर्वात कमी 2.10%

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 28 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात दर 10 लाख लोकसंख्येवर दररोज 140 पेक्षा जास्त चाचण्या होत आहेतnat

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात मागील 24 तासात 6.6 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सेक्रेटरी राजेश भूषण यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. पहिल्या लॉकडाउनंतर मृत्यूदर सर्वात कमी 2.10% झाला आहे.

10 लाख लोकसंख्येवर दररोज 140 पेक्षा जास्त चाचण्या

अनेक राज्यांनी आपल्या चाचण्यांची मर्यादा वाढवली आहे. यात आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजन टेस्ट्सचा समावेश आहे. 28 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 10 लाख लोकसंख्येवर दररोज 140 पेक्षा जास्त टेस्ट होत आहेत.

मृत्यूचा आकडा कमी दाखवण्याच्या दावा चुकीचा

आरोग्य मंत्रालयानुसार, मृत्यूचा आकडा कमी दाखवल्या चुकीचा दावा माध्यमांमध्ये काला जात आहे. यासाठी प्रोटोकॉल आहे. अनेकवेळा दुसऱ्या आजारानेही मृत्यू होतो. डेथ रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच मृत्यूचा आकडा सांगितला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये डेथ रजिस्ट्रेशनमध्ये वेळ लागू शकतो. त्यामुळे मेडिकल सर्टिफाइड डेथ आणि टोटल डेथमधील अंतर समजून घेतले पाहिजे.

देशात सध्या 60 हजार वेंटिलेटरचा वापर

आरोग्य मंत्रालयने सांगितल्यानुसार, 15 हजार वेंटिलेटर पीएम केअर फंडमधून मिळवले आहेत. यात 2,000 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. देशभरात सध्या 60 हजार वेंटिलेटरचा वापर होत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे आपल्याला चिंतीत होण्याची गरज नाही

भूषण यांनी म्हटले की, व्हायरसच्या म्युटेशनची पुण्यातील वायरोलोजी इंस्टीट्यूटमध्ये स्टडी होत आहे. यात म्यूटेशन होत असल्याचे समोर आले आहे, पण हे सामान्य आहे. एखाद्या व्हायरसमध्ये मोठ्या म्युटेशनसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. ठीक होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

बातम्या आणखी आहेत...