आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Health Ministry Told The Post Recovery Protocol Daily Yoga, Pranayama, Meditation And Walk Once A Day; 47.54 Lakh Cases In The Country So Far

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:आरोग्य मंत्रालयाने सांगितले रिकव्हरीनंतरचे प्रोटोकॉल - रोज योगासन, प्राणायम, मेडिटेशन आणि दिवसातून एकदा वॉक करा, आतापर्यंत देशात  48.34  लाख केस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 10.60 लाखांच्या पुढे

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांसाठी गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की, रोज योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन करा. सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य वॉक करा, तसेच तुम्हाला गरज लागेल त्याच स्पीडने चला.

देशात 24 तासांमध्ये कोरोनाचे 82 हजार 498 रुग्ण आढळले आहे. यासोबतच आतापर्यंत 48लाख 34 हजार 386 लोक संक्रमित झाले आहेत. देशात आतापर्यंत 37 लाख 64 हजार 779 लोक बरे झाले आहेत. एका दिवसात रविवारी 1,045 मृत्यू झाले आहेत. मृतांची एकूण संख्या आता 79 हजार 669 झाली आहे.

महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाचे 22 हजार 543 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एूण संख्या 10 लाख 60 हजार 308 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 416 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 29 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 24 तासात 11 हजार 549 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत 7 लाख 40 हजार 061 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात सद्यस्थितीत 2 लाख 90 हजार 344 जणांवर उपचार सुरु आहेत.

अर्जुन खोतकर यांना कोरोना

​​​​ शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुकवरुन याबाबत माहिती दिली. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.​​​​​​​