आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Miracle Pregnancy With Twins | Superfetation Causes A Woman To Become Pregnant Twice In 5 Days | Marathi News

2 मुलांचा जन्म, पण जुळी नाहीत:सुपरफेटेशनमुळे महिला 5 दिवसांत दोनदा गर्भवती झाली, जगात अशी फक्त डझनभर प्रकरणे

टेक्सासएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील टेक्सास येथील एक महिला 5 दिवसांत दोनदा गर्भवती राहिली. ही घटना 25 वर्षीय कारा विनहोल्डने सोशल मीडियावर शेअर केली आहे. एक वर्षापूर्वी गर्भपातामुळे कारा निराश झाली होती, पण आता दोन मुलांचा एकत्र जन्म झाल्यामुळे ती खूप आनंदी आहे.

मुले जुळी नाहीत
हे प्रकरण अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील आहे. काराला 5 दिवसांत दोनदा गर्भधारणा झाली. काराच्या म्हणण्यानुसार, ती प्रेग्नेंसीची प्लॅनिंग करत होती, पण तिला समजले की तिने दुसऱ्यांदाही कन्सिव्ह केले आहे. ती आधीच गर्भवती असताना पुन्हा हे घडले. काराने दुसरी गर्भधारणा तर केली, परंतु ते जुळे नव्हते. दोन्ही गर्भधारणेत ५ दिवसांचे अंतर होते. वैद्यकीय भाषेत, या प्रकारच्या परिस्थितीला सुपरफीटेशन म्हणतात.

सुपरफेटेशन काय आहे
जेव्हा आधीच फर्टीलाइझ्ड एग आईच्या गर्भाशयात वाढत असते आणि या दरम्यान गर्भवती महिलेचे एग पुन्हा शुक्राणूंद्वारे फर्टीलाइझ्ड होते, तेव्हा त्याला सुपरफेटेशन म्हणतात. जेव्हा महिलेचे एग आधीपासूनच सुरु असलेल्या प्रग्नेंसीच्या काही दिवसांनी किंवा आठ्वड्यानी स्पर्मने फर्टीलाइझ्ड होते किंवा इम्प्लांट केले जाते, तेव्हा ती त्या महिलेची दुसरी गर्भधारणा असते.

  • वास्तविक, गर्भधारणेनंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. यामुळे स्त्रीच्या अंडाशया(ovary)तुन अंडी बाहेर येणे बंद होते. त्यामुळे या काळात पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता नसते.
  • सुपरफेटेशन ही एक कठीण स्थिती असू शकते कारण दोन भ्रूण वेगवेगळ्या फेजमध्ये असतात. जेव्हा एक जास्त विकसित होतो, तेव्हा दुसरा मागे असतो. अशा परिस्थितीत, एकतर प्रसूतीनंतर, स्त्री दुसऱ्या बाळाला बरेच दिवस पोटात ठेवते. किंवा कॉम्प्लिकेशन झाल्यास मुदतपूर्व प्रसूती करावी लागते.
  • मासे, ससा आणि ब्रेजर या प्राण्यांच्या प्रजातींमध्ये सुपरफेटेशन वारंवार दिसून येते, परंतु मानवांमध्ये क्वचितच दिसून येते.
  • हे सुपरफेटेशन आहे की ट्विन एब्जॉर्प्शन हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर दर दोन आठवड्यांनी काराचे अल्ट्रासाउंड करत होते. तसेच बाळ कुपोषित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ते अल्ट्रासाउंड करत होते.

भ्रूण विकसित होण्यापासून बाळाचा जन्म निश्चित होतो
आधीच गर्भवती असेलेली स्त्री पुन्हा गरोदर राहिली, तर गर्भातील दोन्ही मुले एकाच वेळी जन्माला येतात, परंतु त्या दोघांमध्ये किती अंतर असेल हे कोणत्या भ्रूणाचा विकास कधीपासून सुरू झाला यावर अवलंबून असेल. तसेच, दोन्ही भ्रूणांच्या आकारात आणि वयात फरक राहतो.

कारा विनहोल्ड आणि तिचा पती ब्लेक त्यांच्या मुलांच्या जन्मापासून खूप आनंदी आहेत. महिलेने सांगितले की 2019 मध्ये तिचा गर्भपात झाला होता पण जेव्हा तिला कळले की तिच्या पोटात दोन मुले वाढत आहेत, तेव्हा आनंदाला थारा राहिला नाही. एका मुलानंतर, तिचा नवरा आणि ती आणखी एका बाळाची प्लॅनिंग करत होते, परंतु काही कारणास्तव तीनदा गर्भपात झाला.

मुलांचे चेहरे मिळते-जुळते
काराने सांगितले की आमच्यासाठी हे जादूपेक्षा कमी नव्हते. तिने आपल्या दोन मुलांची नावे सेल्सन आणि सेदान अशी ठेवली आहेत. काराने सांगितले की तिच्या दोन्ही मुलांचे चेहरे मिळते-जुळते आहेत आणि आम्ही दोघांमध्ये अनेकदा कन्फ्युज होतो. कारा म्हणाली, दोघेही अगदी सारखेच दिसतात, त्यामुळे लोक अनेकदा विचारतात की दोघेही जुळे आहेत का.

बातम्या आणखी आहेत...