आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Miranda House Is Best University In India, Behind JNU; IISC Bangalore Best University; IIT Madras Tops

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मिरांडा हाऊस सर्वश्रेष्ठ, जेएनयू मागे; आयआयएससी बंगळुरू बेस्ट युनिव्हर्सिटी; आयआयटी मद्रास अव्वल

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी केली जाहीर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी उच्च शिक्षण संस्थांची २०२० ची क्रमवारी जाहीर केली. यात आयआयटी मद्रास अव्वलस्थानी आहे. विद्यापीठांत इंडियन इन्स्टट्यूट ऑफ सायन्सेस, बंगळुरू, व्यवस्थापनात आयआयएम अहमदाबाद, कॉलेजमध्ये मिरांडा हाऊस-दिल्ली, मेडिकलमध्ये एम्स-दिल्ली, तर लॉ कॉलेजमध्ये नॅशनल लॉ स्क्ूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी-बंगळुरू पहिल्या स्थानी आहेत. या वर्षी प्रथमच डेंटल कॉलेजचीही क्रमवारी जाहीर झाली. यात दिल्लीतील आझाद कॉलेज अव्वल ठरले.

कसे ठरले सर्वश्रेष्ठ : संस्थेच्या संचालकांनी सांगितले यशाचे गमक

आयआयटी मद्रास : सरकारच्या अनेक विभागासोबत प्रकल्प

> २०१९ मध्ये सर्वाधिक संशोधन आणि प्लेसमेंट देण्यात आल्या. > जागतिक स्तरावर संशोधनात सर्वाधिक वाटा, संरक्षण विभागासह प्रकल्पात सहभाग > सर्वाधिक इनोव्हेशन दिले. > सरकारच्या अनेक विभागासोबत प्रकल्पांत सहभाग - प्रो. भास्कर राममूर्ती, संचालक

> २०१६ पासून ही क्रमवारी देण्यात येते. प्रत्येक क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना विविध निकषांआधारे गुण देण्यात येतात. यात अध्यापन, लर्निंग व साधने, संशोधन तसेच प्रोफेशनल प्रॅक्टिसेस, संस्थांचे निकाल-प्लेसमेंट, जागतिक स्तरावर भागीदारी तसेच संस्थांबाबत लोकांचे मत नोंदवले जाते. मिरांडा हाऊस - रिसर्च सेंटर, फॅकल्टींचे इनहाऊस प्रशिक्षण

> रिसर्च सेंटरद्वारे शिक्षण आणि बेस्ट प्रॅक्टिस कायम ठेवली. देशातील अव्वल संशोधन संस्थांतील तज्ञ बोलावण्यात आले. > दुसऱ्या संस्थांशी रिसर्च लिंक तगड्या केल्या. ग्रॅज्युएशन रिझल्ट, फॅकल्टीच्या इनहाऊस प्रशिक्षणावर भर - डॉ. विजयलक्ष्मी, प्राचार्य

आयआयएम ए : संशोधन-विकासात स‌‌‌र्वाधिक वाटा

> संशोधन-विकासात स‌‌‌र्वाधिक वाटा नोंदवला. देश-जगात स‌‌र्वाधिक अॅल्युमनी संख्या.

> सार्वजनिक धोरण तयार करण्यात सर्वाधिक वाटा.

> शिकवणे व शिकणे संसाधनात सर्वात जास्त भूमिका.

> केस स्टडी पद्धतीत सर्वाधिक संस्थासोबत भागीदारी - प्रा. शैलेश गांधी, प्रोग्राम डीन

बातम्या आणखी आहेत...