आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mission Corona Armor : Prime Minister Narendra Modi Will Interact With Three Teams Involved In Developing A Vaccine For COVID 19, Asking The General Public To Explain The Vaccine In Simple Terms.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचे मिशन कोरोना कवच:पंतप्रधानांनी 3 व्हॅक्सिन कंपन्यांसोबत चर्चा केली, सामान्य लोकांना लसीबद्दल सोप्या शब्दात सांगण्यास सांगितले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी मोदींनी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबादेतील कंपन्यांच्या लसी विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला - Divya Marathi
शनिवारी मोदींनी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबादेतील कंपन्यांच्या लसी विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला
  • पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीच्या टीमशी चर्चा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांत दुसऱ्यांदा कोरोना लस बनवणाऱ्या टीमसोबत चर्चा केली. मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे जेनोवा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्या पथकांशी चर्चा केली. या कंपन्यांच्या लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. यांचा डेटा आणि निकाल पुढील वर्षाच्या सुरुवातीस येण्याची अपेक्षा आहे. या चर्चेवेळी सर्वसामान्यांना लसीच्या परिणामांसारख्या गोष्टी पटवून देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला. या चर्चेत लसीच्या डिलीवरीचे लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट आणि कोल्ड चेन या विषयांवरही चर्चा झाली.

मोदींनी लस कंपन्यांकडून सूचना मागवल्या

पंतप्रधान मोदींनी या कंपन्यांच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच लस विकासाच्या प्लॅटफॉर्मबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी तिन्ही कंपन्यांना लस मंजुरीशी संबंधित प्रक्रिया व इतर बाबींबाबत सूचना देण्यास सांगितले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार मोदींनी संबंधित विभागांना सांगितले की, लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून त्यांचे प्रश्न सोडवावेत. जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळू शकेल.

याआधी शनिवारी मोदींनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट, अहमदाबादेतील जायडस बायोटेक पार्क आणि हैदराबादमधील भारत बायोटेक प्लांटचा दौरा केला होता. मोदींनी या तिन्ही कंपन्यांच्या लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser