आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mixing Corona Vaccine Latest News Update; Mixing Corona Vaccine, AIIMS Chief Dr Randeep Guleria, AIIMS Chief, AIIMS; News And Live Updates

डेल्टा प्लस व्हेरिएंटवर चांगली बातमी:एम्स प्रमुख म्हणाले - डेल्टा प्लसपासून संरक्षणासाठी लस मिक्सिंगदेखील पर्याय, यामुळे वाढते रोग प्रतिकारशक्ती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॅक्सिन मिक्सिंगवर अजून संशोधनाची गरज

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशातील सर्वच लोक चिंतेत आहे. याला रोखण्यासाठी केंद्र सरकार संबंधित राज्यांना कडक पाऊले उचलण्यास सांगत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीचे मिक्सिंग पर्याय असू शकते असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. यामुळे रोग प्रतिकारशक्तीत वाढ होत असून डेल्टा प्लस व्हेरिएंटसोबत लढण्यास बळ मिळू शकते असे ते म्हणाले. परंतु, लसींच्या मिक्सिंगवर अजून जास्त संशोधनाची गरज असल्याचे यांनी सांगितले.

हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, प्रारंभिक अभ्यासात लसींचे मिश्रण देखील एक पर्याय असू शकते असे समोर आले आहे. परंतु, यावर आपल्याला अजून जास्त डेटाची गरज असून कोणते मिश्रण जास्त फायद्याचे ठरेल हा संशोधनाचा विषय आहे. लसींच्या या मिश्रणावर इतरही देशात संशोधन सुरु असल्याचे डॉ. गुलेरिया म्हणाले.

डेल्टा विरूद्ध एकच डोस पुरेसा नाही - गुलेरिया
डॉ. गुलेरिया म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंटच्या विरूद्ध एकच डोस पुरेसा असू शकत नाही. कारण एक डोस 33% पर्यंत संरक्षण देते तर दोन्ही डोस 90 टक्के सुरक्षित असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यामुळे कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरुद्ध लढण्यासाठी एक डोस ही चिंतेची बाब असून आणखी एक डोस देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

व्हॅक्स‍िन मिक्सिंगवर दोन अहवाल प्रसिद्ध
पहिला
- गेल्या महिन्यात द लान्सेट जर्नलमध्ये एक ब्रिटीश स्टडी प्रकाशित झाली होती. यामध्ये लोकांना आधी कोव्ह‍िशील्ड आण‍ि नंतर फाइझरचा दुसरा डोस देण्यात आला. याचा काही काळासाठी दुष्परिणाम झाला असून ते खूपच सौम्य होते. यावर अजून डेटा येण्याचे बाकी आहे.

दुसरा - स्पेनमधील पूर्वीच्या अभ्यासानुसार कोव्ह‍िशील्ड आणि फायझर लसीला एकत्रितपणे केल्यास सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले होते.

तिसरी लाट रोखण्याचे 4 उपाय

  • भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल.
  • लोकांना कोविड गाइडलाइन्सचे पालन करावे लागेल.
  • अशा परीसरांची मॉनिटरिंग करावे लागेल, जेथे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
  • जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 5% पेक्षा जास्त आहे, तेथे कंटेनमेंट क्षेत्र घोषित करावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...