आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAPची महिला आमदार कौटुंबिक हिंसाचाराची बळी:पती CCTV मध्ये मारहाण करताना दिसला, जवळच्या लोकांनी दूर ढकलून केली सुटका

चंदिगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या तलवंडी साबोच्या आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार प्रोफेसर बलजिंदर कौर कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. त्यांना त्याचे पती सुखराज बल यांनी मारहाण केली. हा प्रकार गत जुलै महिन्यातील आहे. पण त्याची सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आता उजेडात आली आहे.

आमदार बलजिंदर कौर व त्यांचे पती सुखराज बल यांनी या प्रकरणी अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेनंतर बलजिंदर कौर सासर सोडून माहेरी राहत आहेत.

बाचाबाचीनंतर मारली थापड

व्हिडिओत बलजिंदर व त्यांचे पती सुखराज यांच्यात बाचाबाची होताना दिसून येत आहे. एवढेच नाही तर सुखराज अचानक आमदार पत्नीच्या कानशिलात लगावतानाही दिसून येत आहे. या प्रकारामुळे अवाक झालेले कुटुंबीय सुखराज याला रोखण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नाही तर काहीजण सुखराज यांना धक्का देतानाही दिसून येतात.

आमदार बलजिंदर कौर यांच्या कानशिलात लगावताना पती.
आमदार बलजिंदर कौर यांच्या कानशिलात लगावताना पती.

महिला आयोग जारी करणार नोटीस

पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी म्हटले आहे की, चक्क आमदार कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणे अत्यंत दुःखद आहे. आतापर्यंत हे प्रकरण त्यांच्या घराच्या चार भिंतीच्या आत होते. पण आता त्याचा व्हिडिओ सार्वजनिक व्यासपीठावर आला आहे. आयोग त्याची दखल घेऊन संबंधितांना नोटीस जारी करेल.

आमदार बलजिंदर कौर व पती सुखराज बल.
आमदार बलजिंदर कौर व पती सुखराज बल.

CM मान यांच्याकडे करणार कारवाईची मागणी

पंजाबच्या महिला विकास मंत्री डॉक्टर बलजीत कौर यांनी सांगितले की, आमदार बलजिंदर कौर यांनी अद्याप या प्रकरणी तक्रार केली नाही. त्या पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाईल.

आमदार बलजिंदर कौर व पती सुखराज बल यांच्या लग्नाचा फोटो.
आमदार बलजिंदर कौर व पती सुखराज बल यांच्या लग्नाचा फोटो.

आपच्या ज्येष्ठ नेत्या, मंत्रिपदाच्याही शर्यतीत होत्या

प्रोफेसर बलजिंदर कौर पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या पंजाबमधील आपच्या संस्थापक सदस्या आहेत. त्या तलवंडी साबो येथून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या. पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यानंतर त्या मंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. पण पक्षाने त्यांना मंत्रिपद दिले नाही. यावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...