आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मोबाइल गेममुळे मुलांचा स्वभाव होतोय चिडचिडा, व्यसनात अडकलेल्या 10 मुलांमध्ये 4 मुलींचा समावेश

जयपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आॅनलाइन गेममुळे मुलावर नव्हे तर किशोरवयीन मुलींवरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यांच्यात चिडचिडेपणा, राग आणि एक्कलकोंडेपणाची भावना वाढत आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, त्यांच्याकडून आई-वडिलांवरही हल्ला होत आहे. जयपूरच्या एका व्यापारी कुटुंबातील १२ वीत शिकणाऱ्या मुलीनेही गेम खेळण्यास नकार दिल्यावर हल्ला केला. या मुलीने दहावीत ८६% गुण प्राप्त केले होते. मात्र, मोबाइलवरील गेमच्या व्यसनामुळे ती रागीट झाली. थोड्याथोड्या गोष्टींवरून घरच्यांना ब्लॅकमेल करू लागली. तिला शिक्षणासाठी फोन दिला होता, मात्र तो घेऊन ती गुजरातला पळून गेली. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात अर्ध्या डझनहून जास्त मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली.

केस-1 : रस्त्यावर फ्री फायर खेळताना दिसली मुलगी
नागाैरमध्ये १५ वर्षीय मुलीचे गेमिंगचे वाढते व्यसन पाहता आई-वडिलांनी तिच्याकडून मोबाइल घेतला. त्यानंतर ती एक दिवस मोबाइल चोरून घरातून पळून गेली. पोलिसांना ही मुलगी घरापासून २० किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला मोबाइल गेम खेळताना दिसली. पोलिस निरीक्षकांनी तिच्याकडून मोबाइल घेतल्यावर तिने निरीक्षकाची कॉलर पकडली.

केस-2: मोबाइल हिसकावून घेतल्यावर आत्महत्येची धमकी
अजमेरमधील एका शेतकरी दांपत्याने मुलीला अभ्यासासाठी स्मार्टफोन दिला. मुलगी ऑनलाइन गेमच्या आहारी गेली. आईने रोखल्यावर मुलीने आत्महत्येची धमकी दिली.

केस-3: गेम सुटू नये यासाठी कपड्यातच टॉयलेट केली. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

-मोबाइल डिसऑर्डर काय आहे?
डब्ल्यूएचओने इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजमध्ये गेमिंग डिसऑर्डरचा समावेश केला आहे. पीडित व्यक्तीला गेमिंगवर कोणतेही नियंत्रण नसते. ते गेमला प्राधान्य देऊ लागतात. मुलांची आक्रमकता, हिंसक होणे आणि नैराश्य याची लक्षणे आहेत.

-मुली गेमिंगला का बळी पडताहेत : मानसोपचारतज्ज्ञांनुसार, मुलांना घराबाहेर जायला, मित्रांसोबत खेळायला मिळते, मुलींना अशी सूट मिळत नाही. त्यामुळे घरात बसल्यामुळे त्या मोबाइल गेम खेळू लागतात. या सवयीतून त्यांना गेम खेळण्याचे व्यसन जडते. याचे प्रमाण वाढल्यानंतर त्या पुढे नैराश्याला बळी पडतात.

बातम्या आणखी आहेत...